Slime बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
तू आपल्याकरिता गोफेर लाकडाचे एक तारू तयार कर; त्यात कोठड्या बनव आणि त्याला आतून व बाहेरून डांबर लाव.
ते एकमेकास म्हणाले, “चला आपण विटा तयार करून त्याला पक्क्या भाजू या.” त्याप्रमाणे त्यांनी दगडाऐवजी विटा तयार केल्या आणि चुना म्हणून डांबर वापरले.
सिद्दीमच्या खोर्यात डांबराच्या अनेक खाणी होत्या. सदोम आणि गमोरा येथील राजांच्या सैन्याने पळ काढला, तेव्हा काहीजण त्या खाणीत पडले, पण बाकीचे सैन्य डोंगरावर पळून गेले.
पण त्यानंतर त्याला ती लपवू शकत नव्हती, तेव्हा तिने त्याच्यासाठी लव्हाळ्याची एक टोपली घेतली, व तिला डांबर आणि चुन्याचा लेप लावला. मग तिने आपल्या बाळाला त्या टोपलीत ठेवले व ती टोपली तिने नाईल नदीच्या काठी लव्हाळ्यात नेऊन ठेवली.
एदोम येथील प्रवाह मैदानासारखे होतील, तिची धूळ जळत्या गंधकात बदलली जाईल. तिची भूमी धगधगते मैदान होईल!