मुख्य मजकुरावर जा

Shoshannim बद्दल बायबलमधील वचने: A wind instrument, mentioned in the titles of selected Psalms

4 वचने · 1 पैलू

A wind instrument, mentioned in the titles of selected Psalms बद्दल वचने

  1. संगीत दिग्दर्शकासाठी. “कुमुदिनी” चालीवर आधारित. कोरहाच्या मुलांची रचना. एक मासकील. विवाह गीत. माझे हृदय एका चांगल्या गोष्टीने ओसंडून जात आहे! राजाकरिता लिहिलेली कविता मी म्हणून दाखवितो; माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी बनली आहे.

  2. संगीत दिग्दर्शकासाठी. “शूशन एदूथ” कराराची कुमुदिनीच्या चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. हे शिकविण्यासाठी लिहिले गेले आहे. दावीद अराम-नहराईम आणि अराम-झोबाह देशांशी युद्ध करीत असतानाच्या परिस्थितीचा हा उल्लेख आहे. त्याचवेळी सेनापती योआब, क्षार खोर्‍यात परतला, त्याने बारा हजार एदोमाच्या सैनिकांचा नाश केला. हे परमेश्वरा, तुम्ही आमचा त्याग केला, आम्हाला फोडून टाकले आहे; तुम्ही आमच्यावर कोपला आहात—आता आम्हाला पूर्वस्थितीवर आणा!

  3. संगीत दिग्दर्शकासाठी. “कुमुदिनी” चालीवर आधारित. दावीदाचे स्तोत्र. परमेश्वरा, मला वाचवा; कारण पाणी गळ्यापर्यंत पोहोचले आहे.

  4. संगीत निर्देशकाकरिता. “कराराची कुमुदिनी” च्या चालीवर आधारित. आसाफाची रचना. एक स्तोत्र. इस्राएलाच्या मेंढपाळा, आमचा धावा ऐका, तुम्हीच योसेफाला मेंढरांच्या कळपाप्रमाणे चालविले. करुबांच्या मध्ये विराजमान असलेले, तुमचे तेजस्वी गौरव प्रगट करा.