Samson बद्दल बायबलमधील वचने: Wife of, estranged
Wife of, estranged बद्दल वचने
आणि शमशोनची पत्नी त्याच्या मेजवानीला उपस्थित असलेल्या त्याच्या एका सोबत्याला देण्यात आली.
काही दिवसानंतर गहू कापण्याच्या हंगामात, शमशोनाने एक शेळी घेतली आणि आपल्या पत्नीला भेटायला गेला. तो म्हणाला, “मी माझ्या पत्नीच्या खोलीत जात आहे.” पण तिचे वडील त्याला आत जाऊ देईना.
“मला खात्री होती की तू तिचा तिरस्कार करतोस,” तो म्हणाला, “मी तिला तुझ्या सोबत्याला दिले. तिची धाकटी बहीण अधिक आकर्षक नाही का? तिच्याऐवजी हिला घेऊन जा.”