Skip to content

Righteous बद्दल बायबलमधील वचने

11 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. परंतु मी तुम्हाला म्हणालो, “तुम्ही त्यांच्या देशाचे मालक व्हाल; मी तुम्हाला तो वारसाप्राप्त संपत्ती असे देईन, दुधामधाचे प्रवाह वाहणारा असा तो देश आहे.” तुम्हाला इतर राष्ट्रांपासून वेगळे राखणारा, मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.

  2. “ ‘तुम्हाला शुद्ध आणि अशुद्ध प्राणी, शुद्ध आणि अशुद्ध पक्षी यांच्यात स्पष्ट फरक करावा लागेल; कोणत्याही पशू, पक्षी किंवा जमिनीवर सरपटणार्‍या प्राण्यामुळे स्वतःला अशुद्ध करू नका, ज्यांना मी तुमच्यासाठी अशुद्ध म्हणून वेगळे केले आहे.

  3. तुम्ही माझ्यासाठी पवित्र असावे, कारण मी याहवेह पवित्र आहे आणि तुम्ही माझे व्हावे म्हणून मी तुम्हाला इतर सर्व राष्ट्रांपासून वेगळे केले आहे.

  4. तुमचा चांगुलपणा किती विपुल आहे, जो तुम्ही तुमच्या भय धरणार्‍यांसाठी राखून ठेवला आहे, आणि जे लोक तुमच्या ठायी आश्रय घेतात त्यांच्यावर त्याचा सर्वांसमक्ष वर्षाव करता.

  5. आपल्या उपस्थितीच्या आश्रयस्थानी तुम्ही मनुष्यांच्या युक्तीपासून त्यांचे रक्षण करता; आपल्या मंडपात तुम्ही त्यांना शत्रूंच्या आरोप करणार्‍या जिभेपासून बचाव करता.

  6. सीयोनच्या लोकांनो, मोठ्याने गर्जना करा आणि आनंद गीते गा, कारण इस्राएलचे महान पवित्र परमेश्वर तुमच्यामध्ये आहेत.”

  7. तरी जीवनाकडे नेणारा दरवाजा लहान असून मार्गही अरुंद आहे आणि अगदी थोडक्यांना तो सापडतो.

  8. “कारण बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडके आहेत.”

  9. माझ्यातील प्रत्येक फांदी जी फळ देत नाही ती ते छाटून टाकतात आणि फळ न देणार्‍या प्रत्येक फांदीला अधिक फळ यावे म्हणून ते तिची छाटणी करतात.

  10. म्हणून मजमध्ये राहा व मी तुम्हामध्ये राहीन. कोणतीही फांदी स्वतःहून फळ देऊ शकत नाही; तिला वेलीमध्येच राहणे भाग आहे. तसेच माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाही फळ देता येणे शक्य नाही.

  11. “मी द्राक्षवेल आहे; तुम्ही फांद्या आहात. जर तुम्ही मजमध्ये राहाल व मी तुम्हामध्ये, तर तुम्ही मुबलक फळ द्याल; कारण माझ्यापासून वेगळे राहून तुम्हालाही काही करता येणार नाही.