Publicans बद्दल बायबलमधील वचने: Zacchaeus, chief among, receives Jesus into his house
Zacchaeus, chief among, receives Jesus into his house बद्दल वचने
तिथे जक्कय नावाचा एक मनुष्य होता; तो प्रमुख जकातदार होता आणि श्रीमंत होता.
येशू कोण आहे हे पाहण्याची त्याची उत्कट इच्छा होती, परंतु तो ठेंगणा असल्यामुळे गर्दीतून पाहणे त्याला शक्य नव्हते.
तो धावत पुढे गेला आणि उंबराच्या झाडावर चढला, कारण येशू त्याच वाटेने येत होते.
येशू त्या झाडाखाली आले आणि वर पाहून जक्कयाला म्हणाले, “जक्कया, त्वरा कर आणि खाली उतर, कारण आज मी तुझ्या घरी पाहुणा म्हणून येणार आहे.”
तेव्हा तो लगेच खाली उतरला आणि त्याने त्यांचे आनंदाने स्वागत केले.
सर्व लोकांनी हे पाहिले आणि ते कुरकुर करू लागले, “तो एका पापी माणसाच्या घरी पाहुणा म्हणून गेला आहे.”
पण जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभूजी, पाहा, आताच मी माझी अर्धी धनसंपत्ती गरिबांना देऊन टाकतो आणि मी फसवणूक करून कोणाचे काही घेतले असेल, तर चौपट रक्कम परत करतो.”
येशू त्याला म्हणाले, “आज या घरात तारणाने प्रवेश केला आहे, हा मनुष्य अब्राहामाचा पुत्र आहे.
मानवपुत्र हरवलेल्यांना शोधण्यासाठी आणि वाचवण्यासाठी आला आहे.”