Skip to content

Pool बद्दल बायबलमधील वचने

5 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. शोमरोनाच्या तळ्याकडे (जिथे वेश्या आंघोळ करीत असत), आणि याहवेहच्या वचनानुसार कुत्र्यांनी त्याचे रक्त चाटून घेतले.

  2. कोल-होजेचा पुत्र शल्लूम मिस्पाह जिल्ह्याचा अधिकारी होता. त्याने झरा वेशीची दुरुस्ती करून ती परत बांधली, तिच्यावर छत टाकले व दरवाजे उभे करून त्यांना अडसर व गज लावले. नंतर शेलाह तळ्यापासून राजाच्या बागेपर्यंतच्या, यरुशलेमच्या दावीदाच्या नगराच्या उतारावरील पायर्‍यापर्यंतच्या कोटाची त्याने दुरुस्ती केली.

  3. हस्तिदंती मनोर्‍यासारखी तुझी मान आहे. तुझे नयन बाथ-रब्बीमच्या वेशीकडे असलेल्या हेशबोनाच्या तळ्यासारखे आहे. तुझे नाक जणू काही लबानोन येथील, जे दिमिष्कच्या दिशेला असलेल्या बुरुजासारखे रेखीव आहे.

  4. “जा, ते त्याला म्हणाले, शिलोआम तळ्यात डोळे धू.” (शिलोआम म्हणजे पाठविलेला.) तेव्हा तो मनुष्य गेला व त्याने डोळे धुतले आणि डोळस होऊन घरी गेला.

  5. तेव्हा त्याने सांगितले, “येशू नावाच्या एका मनुष्याने चिखल केला आणि माझ्या डोळ्यांवर लावला. मग मला शिलोआमाच्या तळ्यावर जाऊन चिखल धुण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी जाऊन धुतले व मला दृष्टी प्राप्त झाली.”