Skip to content

Pedaiah बद्दल बायबलमधील वचने

8 वचने · 6 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. वयाच्या पंचविसाव्या वर्षी यहोयाकीम राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये अकरा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव जबूदाह होते; ती रुमाह येथील पदायाहची कन्या होती.

  2. मल्कीराम, पदायाह, शेनस्सर, यकम्याह, होशामा व नेदब्याह.

  3. पदायाहचे पुत्र: जरूब्बाबेल व शिमी. जरूब्बाबेलाचे पुत्र: मशुल्लाम, हनन्याह. त्याच्या कन्येचे नाव शेलोमीथ.

  4. एफ्राईमच्या गोत्रावर: अजज्याहचा पुत्र होशेय; मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रावर: पदायाहचा पुत्र योएल;

  5. उजईचा पुत्र पलालने कोट कोपर्‍यापासून राजवाड्याच्या वरच्या माळाजवळील तुरुंगाच्या अंगणापर्यंत काम करून बुरुजाचीही डागडुजी केली. त्याच्या शेजारी पारोशाचा पुत्र पदायाहनेही डागडुजी केली.

  6. त्या प्रसंगासाठी खास तयार केलेल्या उंच लाकडी चौकटीवर एज्रा शिक्षक उभा राहिला. त्याच्या उजवीकडे मत्तिथ्याह, शमा, अनायाह, उरीयाह, हिल्कियाह व मासेयाह हे उभे होते; व त्याच्या डावीकडे पदायाह, मिशाएल, मल्कीयाह, हाशूम, हश्बद्दानाह, जखर्‍याह व मशुल्लाम हे उभे होते.

  7. बिन्यामीनच्या गोत्रातील: सल्लू, हा मशुल्लामाचा पुत्र, तो योएदाचा पुत्र, तो पदायाहचा पुत्र, तो कोलायाहचा पुत्र, तो मासेयाहचा पुत्र, तो इथिएलाचा पुत्र, तो यशायाहचा पुत्र होता.

  8. मी शेलेम्याह याजक, सादोक शास्त्री आणि पदायाह नामक लेवींना कोठारांत अधिकारी म्हणून नेमले व त्यांचा मदतनीस म्हणून हानान, जो जक्कूराचा पुत्र व मत्तन्याहचा नातू होता, याची नेमणूक केली. कारण हे सर्वजण विश्वासयोग्य मानले जात होते. आपल्या लेवी बांधवांना अर्पणाचे वाटप प्रामाणिकपणे करण्याची त्यांना जबाबदारी देण्यात आली.