मुख्य मजकुरावर जा

Nolle Prosequi बद्दल बायबलमधील वचने

6 वचने · 1 पैलू

"Nolle Prosequi" साठी शोधा

प्रमुख बायबल वचने

  1. गल्लियो अखया प्रांताचा राज्यपाल झाला, तेव्हा पौलाला तिथून घालवून द्यावे म्हणून करिंथ येथील यहूद्यांनी एकजूट होऊन त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला न्यायालयात आणले.

  2. त्यांनी पौलावर असा आरोप केला, “हा मनुष्य, आमच्या नियमशास्त्राविरुद्ध परमेश्वराची उपासना करण्यासाठी लोकांची मने वळवित आहे.”

  3. पौल आता बोलणार होता इतक्यातच, गल्लियो त्यांना म्हणाला, “जर तुम्ही यहूदी गंभीर गुन्हा किंवा दुराचाराची तक्रार करीत असाल, तर तुमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी काहीतरी कारण असते.

  4. परंतु ज्याअर्थी हा वाद निव्वळ शब्दांचा आणि नावांचा आणि तुमच्या नियमशास्त्राबद्दलचा आहे, त्याअर्थी तुम्हीच हे प्रकरण मिटवा. अशा प्रकारच्या वादांचा न्यायनिवाडा करण्याचे मी साफ नाकारतो.”

  5. असे म्हणून त्याने त्यांना न्यायालयासमोरून घालवून दिले.

  6. त्यानंतर जमावाने सोस्थनेस या सभागृहाच्या पुढार्‍यास पकडले आणि न्यायालयासमोरच त्याला मार दिला; परंतु गल्लियोने तिकडे अजिबात लक्ष दिले नाही.