Nazarites बद्दल बायबलमधील वचने: To shave their heads
To shave their heads बद्दल वचने
“ ‘मग नाजीराने आपल्या डोक्यावरील केस जे त्यांच्या समर्पणाचे प्रतीक आहे, ते सभामंडपाच्या दारात मुंडवावे. मग ते केस घेऊन त्यांनी शांत्यर्पणाखाली असलेल्या अग्नीत टाकावे.
पौल करिंथ येथे काही काळ राहिला. नंतर त्याने तेथील विश्वासणार्या बंधू व भगिनींचा निरोप घेतला आणि प्रिस्किल्ला व अक्विलाला बरोबर घेऊन तो सीरियाला जाण्यासाठी जलप्रवासास निघाला. परंतु या प्रवासाला निघण्याआधी, किंख्रिया या ठिकाणी पौलाने आपल्या डोक्याचे मुंडण करून घेतले, कारण त्याने नवस केलेला होता.
तर तू या माणसांना घेऊन शुद्धीकरणाचा विधी पूर्ण कर आणि त्यांच्या मुंडणाचा खर्च कर, म्हणजे ते त्यांच्या डोक्यांचे मुंडण करू शकतील व प्रत्येकाला समजेल की तू स्वतःसुद्धा नियमशास्त्र पाळतोस आणि तुझ्याबद्दलच्या अहवालात जे सांगितलेले आहे, त्यात काही तथ्य नाही.