मुख्य मजकुरावर जा

Michal बद्दल बायबलमधील वचने: Given to David as a reward for slaying Goliath

7 वचने · 5 पैलू

Given to David as a reward for slaying Goliath बद्दल वचने

  1. तेव्हा शौलाने आपल्या सेवकांना आज्ञा दिली: “दावीदाशी गुप्तपणे बोलून सांगा की राजाला तू आवडतोस आणि त्याच्या सर्व सेवकांची तुझ्यावर प्रीती आहे; म्हणून राजाचा जावई हो.”

  2. हे शब्द शौलाच्या सेवकांनी दावीदाला सांगितले. परंतु दावीद म्हणाला, “मी केवळ एक गरीब व अप्रसिद्ध मनुष्य आहे, राजाचा जावई होणे तुम्हाला फार हलकी गोष्ट वाटते काय?”

  3. दावीद जे काही म्हणाला ते शौलाच्या सेवकांनी जेव्हा शौलाला कळविले,

  4. शौलाने उत्तर दिले, “दावीदाला सांगा राजाला हुंडा म्हणून काही नको, मात्र राजाच्या शत्रूंचा सूड घ्यावा म्हणून शंभर पलिष्ट्यांची अग्रत्वचा पाहिजे.” दावीद पलिष्ट्यांच्या हाती मरून जावा यासाठी ही शौलाची योजना होती.

  5. सेवकांनी ज्यावेळी या गोष्टी दावीदाला सांगितल्या, तो राजाचा जावई होण्यास आनंदाने तयार झाला, ठरविलेल्या वेळे आधी

  6. दावीदाने आपली माणसे आपल्याबरोबर घेतली व जाऊन दोनशे पलिष्ट्यांना मारले आणि त्यांच्या अग्रत्वचा आणल्या, दावीद राजाचा जावई व्हावा म्हणून त्यांनी त्या मोजल्या. मग शौलाने आपली कन्या मीखल दावीदाला त्याची पत्नी म्हणून दिली.

  7. जेव्हा शौलाला लक्षात आले की याहवेह दावीदाबरोबर होते आणि त्याची कन्या मीखल हिची दावीदावर प्रीती होती,