Skip to content

Menstruation बद्दल बायबलमधील वचने

20 वचने · 6 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. आता अब्राहाम व साराह दोघेही खूप वृद्ध झाली होती. साराहला मुले होण्याचा काळ केव्हाच निघून गेला होता;

  2. राहेल त्याला म्हणाली, “बाबा मी तुमच्यापुढे उभी राहू शकत नाही कारण मी ॠतुमती आहे.” अशाप्रकारे त्याने शोध केला, परंतु त्याला कुलदैवतांच्या मूर्ती आढळल्या नाही.

  3. “स्त्री ॠतुमती होते, तेव्हा तिने विधिनियमानुसार सात दिवस अशुद्ध राहावे. त्या काळात जो कोणी तिला स्पर्श करेल, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  4. “याकाळात ती ज्या अंथरुणावर झोपेल किंवा बैठकीवर बसेल, ती सर्व अशुद्ध होतील

  5. जो कोणी तिच्या अंथरुणाला स्पर्श करेल त्या व्यक्तीने आपली वस्त्रे धुवावीत, स्नान करावे व तो सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  6. जो कोणी तिच्या बैठकीला स्पर्श करेल त्या व्यक्तीने आपली वस्त्रे धुवावीत, स्नान करावे व तो सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  7. जो कोणी तिच्या अंथरुणाला किंवा बैठकीला स्पर्श करेल तो व्यक्ती सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  8. “याकाळात तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणारा पुरुष सात दिवस अशुद्ध राहील आणि ज्या बिछान्यावर तो झोपेल तो अशुद्ध समजावा.

  9. “महिन्यात अनियमित वेळा किंवा मासिक पाळीच्या दिवसानंतरही जर ॠतुस्राव चालू राहिला, तर त्यामुळे मासिक पाळीच्या अशुद्धतेप्रमाणे ती या अशुद्ध स्त्रावात अशुद्धच राहील.

  10. म्हणजे, नियमित मासिक पाळी चालू असलेल्या ॠतुस्रावाच्या काळात ती ज्या अंथरुणावर झोपेल ते अशुद्ध होईल; आणि ज्या बैठकीवर बसेल ती ही अशुद्ध होईल.

  11. जी व्यक्ती तिच्या अंथरुणाला वा बैठकीला स्पर्श करेल ती अशुद्ध होईल. त्या व्यक्तीने आपली वस्त्रे धुवावीत व स्नान करावे आणि तो सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील.

  12. “जेव्हा ती स्त्री तिच्या स्त्रावातून शुद्ध होईल, तेव्हा तिने शुद्ध होण्यासाठी सात दिवस मोजावे, त्यानंतर ती शुद्ध होईल.

  13. आठव्या दिवशी तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे आणावी;

  14. याजकाने एकाचे पापार्पण व दुसर्‍याचे होमार्पण म्हणून याहवेहपुढे अर्पून तिच्या स्त्रावाच्या अशुद्धतेकरिता प्रायश्चित्त करावे.

  15. “ ‘एखादी स्त्री ॠतुमती असताना तिच्याबरोबर एखाद्या व्यक्तीने शारीरिक संबंध ठेवले, तर त्याने तिच्या प्रवाहाचा स्त्रोत उघड केला आहे आणि तिने देखील ते उघड केले आहे. तर दोघांनाही समुदायामधून बहिष्कृत करावे.

  16. मग तुम्ही तुमच्या चांदीने मढविलेल्या मूर्ती आणि सोन्याने आच्छादित असलेल्या तुमच्या प्रतिमांची विटंबना कराल. तुम्ही त्यांना मासिक पाळीच्या कपड्याप्रमाणे फेकून द्याल आणि त्यांना असे म्हणाल, “आमच्यापासून दूर व्हा!”

  17. वाळवंटात भटकण्याची सवय असलेल्या रानगाढवी प्रमाणे आहात, तुमच्या अनावर वासनांमुळे प्रत्येक वाऱ्याचा शोध घेणारे आहात; तुमच्या वासनांना कोणी आवर घालावा? कोणत्याही नराने तुमचा माग घेत असता स्वतःस थकवा आणू नये; संभोगासमयी त्यांना ती सापडेल.

  18. सीयोन हात पसरीत आहे, पण तिचे सांत्वन करण्यास कोणीही नाही. कारण याहवेहने याकोबाविषयी फर्मान काढले आहे तिचे शेजारीच तिचे शत्रू होवोत; तिच्या शेजाऱ्यामध्ये यरुशलेम अमंगळ वस्तूसारखी झाली आहे.

  19. तो डोंगरावरील पूजास्थानातील प्रसाद खात नाही किंवा इस्राएलच्या मूर्तींकडे पाहत नाही. तो आपल्या शेजार्‍याच्या पत्नीला भ्रष्ट करीत नाही किंवा मासिक पाळीच्या वेळी स्त्रीबरोबर लैंगिक संबंध करीत नाही.

  20. “मानवपुत्रा, इस्राएली लोक जेव्हा स्वदेशात राहत होते, तेव्हा त्यांनी तो त्यांच्या वर्तनाने व कृत्यांनी भ्रष्ट केला. त्यांची कृत्ये माझ्या दृष्टीत स्त्रियांच्या महिन्याच्या अशुद्धतेप्रमाणे होती.