मुख्य मजकुरावर जा

Martyrdom बद्दल बायबलमधील वचने: Prophets and Saints of old

5 वचने · 20 पैलू

Prophets and Saints of old बद्दल वचने

  1. जेव्हा ईजबेल याहवेहच्या संदेष्ट्यांना मारून टाकत होती, तेव्हा ओबद्याहने शंभर संदेष्ट्यांना प्रत्येकी पन्नास असे दोन गुहांमध्ये लपविले होते, आणि त्यांना अन्नपाणी पुरविले.)

  2. एलीयाह म्हणाला, “सर्वसमर्थ याहवेह परमेश्वरासाठी मी फार ईर्ष्यावान आहे. इस्राएली लोकांनी आपला करार नाकारला आहे, आपल्या वेद्या फोडल्या आहेत आणि आपल्या संदेष्ट्यांना तलवारीने मारून टाकले आहे. मी एकटाच उरलो आहे आणि आता ते मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.”

  3. म्हणून जगाच्या प्रारंभापासून सर्व संदेष्ट्यांचे जे रक्त सांडण्यात आले, त्याबद्दल या पिढीला जबाबदार धरले जाईल.

  4. हाबेलाच्या रक्तापासून तर जखर्‍याहच्या रक्तापर्यंत जो मंदिर आणि वेदी यांच्यामध्ये वधला गेला होता. त्याबद्दल या पिढीला जबाबदार धरले जाईल हे मी तुम्हाला सांगतो.

  5. काहींचा दगडमाराने मृत्यू झाला, तर काहींचे करवतीने दोन तुकडे करण्यात आले; काहींना तलवारीने ठार करण्यात आले, काहीजण मेंढरांची व बकर्‍याची कातडी पांघरूण वाळवंटात व पर्वतांवर भटकत असत. ते निराधार, पीडित व वाईट वागणूक मिळालेले होते.