Skip to content

Laodicea बद्दल बायबलमधील वचने

11 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. लावदिकीया येथील विश्वासणार्‍या बंधुजनांस, नुंफा व तिच्या घरात जमणार्‍या मंडळीला माझ्या शुभेच्छा सांगा.

  2. तुमच्यासाठी हे पत्र वाचून झाल्यानंतर ते लावदिकीया मंडळीकडेसुद्धा वाचण्यास देणे आणि त्याबदल्यात लावदिकीयाकडून आलेले पत्र वाचावे.

  3. “लावदिकीया येथील मंडळीच्या देवदूताला लिही: जे आमेन आहेत, विश्वासू व खरे साक्षी आणि परमेश्वराच्या सृष्टीचे शासक आहेत, ते असे म्हणतात.

  4. तुमची कृत्ये मला ठाऊक आहेत. तुम्ही थंड नाही व उष्ण नाही. तुम्ही थंड किंवा उष्ण असता तर बरे झाले असते!

  5. पण तुम्ही कोमट आहात, म्हणजे उष्ण नाही आणि थंडही नाही; म्हणून मी तुम्हाला माझ्या मुखातून बाहेर ओकून टाकीन.

  6. तुम्ही म्हणता, ‘मी श्रीमंत आहे; हवे ते धन मिळविले आहे; मला कशाचीही उणीव नाही’ पण तुम्ही कष्टी, दीन, दरिद्री, आंधळे व नग्न आहात, हे तुम्हाला समजत नाही.

  7. म्हणून तुम्हाला माझा असा सल्ला आहे की श्रीमंत होण्यासाठी तुम्ही माझ्याकडून अग्नीत शुद्ध केलेले सोने विकत घ्यावे. तुमची लज्जास्पद नग्नता झाकण्यात यावी म्हणून तुम्ही माझ्याकडून स्वच्छ, शुद्ध, शुभ्र वस्त्रे विकत घ्यावी. तुम्हाला दृष्टीलाभ व्हावा म्हणून तुम्ही माझ्याकडून अंजन विकत घ्यावे.

  8. ज्यांच्यावर मी प्रीती करतो, त्यांना मी दटावतो व शिक्षा देऊन शिस्त लावतो. म्हणून आस्थावान होऊन पश्चात्ताप करावा.

  9. पाहा! मी दाराशी उभा राहून, दार ठोठावीत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल, तर मी आत येईन; मी त्याच्याबरोबर भोजन करेन आणि तो माझ्याबरोबर भोजन करेल.

  10. जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या राजासनावर बसण्याचा अधिकार देईन, जसा मी विजय मिळवून माझ्या पित्याबरोबर त्यांच्या राजासनावर बसलो.

  11. ज्याला ऐकावयास कान आहेत तो, आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ऐको.”