Skip to content

Incest बद्दल बायबलमधील वचने

20 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. “ ‘तुमच्यापैकी कोणीही आपल्या जवळच्या नातलगाशी शारीरिक संबंध ठेऊ नये; मी याहवेह आहे.

  2. “ ‘तुझ्या आईबरोबर शारीरिक संबंध ठेवून वडिलांचा अनादर करू नकोस. ती तुझी आई आहे; तिच्याशी संबंध ठेवू नकोस.

  3. “ ‘तुझ्या वडिलांच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवू नकोस; जे तुझ्या वडिलांचा अपमान करेल.

  4. “ ‘तुझ्या बहिणीशी शारीरिक संबंध तू ठेवू नकोस, तुझ्या वडिलांची कन्या असो किंवा तुझ्या आईची कन्या, मग ती एकाच घरात जन्मली असेल किंवा इतरत्र.

  5. “ ‘तू तुझ्या पुत्राच्या कन्येशी किंवा तुझ्या कन्येच्या कन्येशी शारीरिक संबंध ठेवू नकोस; त्यामुळे तुझा अपमान होईल.

  6. “ ‘तुझ्या पित्याच्या पत्नीच्या कन्येशी शारीरिक संबंध ठेवू नकोस; ती तुझी बहीण आहे.

  7. “ ‘तू तुझ्या पित्याच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नकोस; ती तुझ्या पित्याची जवळची नातेवाईक आहे.

  8. “ ‘तुझ्या मातेच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नकोस, कारण ती तुझ्या आईची जवळची नातेवाईक आहे.

  9. “ ‘आपल्या पित्याच्या भावाचा त्याच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवून त्याचा अपमान करू नका; ती तुझी चुलती आहे.

  10. “ ‘तू तुझ्या सूनेशी शारीरिक संबंध ठेवू नकोस. ती तुझ्या पुत्राची पत्नी होय; तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवू नकोस.

  11. “ ‘तुझ्या भावाच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेऊ नकोस; हा तुझ्या भावाचा अपमान आहे.

  12. “ ‘तू एखाद्या स्त्रीसोबत आणि तिच्या कन्येसोबत शारीरिक संबंध ठेऊ नकोस. तिच्या पुत्राच्या किंवा कन्येच्या कन्येशी तू शारीरिक संबंध ठेऊ नकोस, कारण ते तिचे जवळचे नातेवाईक आहेत; आणि असे करणे भयंकर पाप आहे.

  13. “ ‘तुझी पत्नी जिवंत असताना तिची वैरीण म्हणून तिच्या बहिणीशी विवाह करू नकोस आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू नका.

  14. “ ‘जो व्यक्ती आपल्या पित्याच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवतो, तो आपल्या पित्याचा अपमान करतो. त्या व्यक्तीला व त्या स्त्रीला अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्ताचा दोष त्यांच्याच माथी राहील.

  15. “ ‘एखाद्या व्यक्तीने आपल्या सुनेबरोबर शारीरिक संबंध ठेवले, तर त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांनी जे केले ते विकृत आहे; त्यांच्या रक्ताचा दोष त्यांच्याच मस्तकी राहील.

  16. “ ‘आईच्या किंवा वडिलांच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नका, कारण त्यामुळे जवळच्या नातेवाईकाचा अपमान होईल; त्यांना आपल्या पापाचा भार वाहावा लागेल.

  17. “ ‘एखाद्या व्यक्तीने आपल्या वडिलांच्या भावाच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवले, तर त्याने त्याच्या वडिलांच्या भावाचा अपमान केला आहे. त्यांना जबाबदार धरले जाईल; ते निःसंतान मरतील.

  18. “ ‘एखाद्या व्यक्तीने आपल्या भावाच्या पत्नीसोबत विवाह केला, तर ते अशुद्धपणाचे कृत्य होय; त्याने आपल्या भावाचा अपमान केला आहे. ते निःसंतान राहतील.

  19. “जो कोणी आपल्या बहिणीबरोबर, त्याच्या पित्याच्या कन्येबरोबर किंवा आपल्या मातेच्या कन्येबरोबर समागम करतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  20. “जो कोणी आपल्या सासूबरोबर समागम करतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.