मुख्य मजकुरावर जा

Humiliation and Self-Affliction बद्दल बायबलमधील वचने

13 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. तुम्ही जो नियम सर्वकाळ पाळला पाहिजे तो हा: सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी तुम्ही स्वतःला नाकारले पाहिजे आणि—तुमच्यामध्ये जन्मलेले स्वदेशी किंवा तुमच्यामध्ये राहणारे परदेशी—कोणतेही कार्य करू नये

  2. कारण या दिवशी तुम्हाला शुद्ध करण्यासाठी तुमच्यासाठी प्रायश्चित्त केले जाईल, तुम्ही याहवेहसमोर तुमच्या सर्व पापांपासून शुद्ध व्हाल.

  3. तुमच्यासाठी हा विसाव्याचा शब्बाथ होय आणि तुम्ही स्वतःला नाकारले पाहिजे; हा कायमचा नियम होय.

  4. नंतर याहवेह मोशेला म्हणाले,

  5. “सातव्या महिन्याचा दहावा दिवस प्रायश्चिताचा दिवस आहे. एक पवित्र मेळावा भरवावा आणि स्वतःचा नकार करावा आणि याहवेहला अन्नार्पण करावे.

  6. या दिवशी तुम्ही कोणतेही कामकाज करू नये, कारण हा दिवस याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे तुम्हाप्रीत्यर्थ प्रायश्चित्त करण्यात येईल.

  7. जे कोणी स्वतःचा नकार करणार नाहीत, त्यांचा त्यांच्या लोकांतून समूळ नाश करण्यात येईल.

  8. जो कोणी त्या दिवशी कोणतेही काम करेल त्याचा मी त्यांच्या लोकांमधून नाश करेन.

  9. कोणीही या दिवशी कोणतेही कामकाज करू नये, तुम्ही कुठेही राहाल, इस्राएलाच्या पिढ्यान् पिढ्यांसाठी हा कायमचा नियम आहे.

  10. तो दिवस तुमच्यासाठी शब्बाथ, विश्रांतीचा दिवस आहे आणि तुम्ही स्वतःला नाकारले पाहिजे. महिन्याच्या नवव्या दिवसाच्या संध्याकाळपासून पुढील संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमचा शब्बाथ पाळावा.”

  11. आम्ही अहवा कालव्याच्या किनारी असतानाच मी जाहीर केले की सर्वांनी उपवास करावा, म्हणजे आपल्या परमेश्वरासमोर आपण स्वतःला नम्र करून, त्यांनी आमचे व आमच्या मुलाबाळांचे व मालमत्तेचे प्रवासात संरक्षण करावे अशी प्रार्थना करावी.

  12. कारण प्रवासात शत्रूपासून संरक्षण मिळावे म्हणून राजाजवळ सैनिक व स्वार मागण्याची मला लाज वाटली. आम्ही राजाला आधीच सांगितले होते, “जे आमच्या परमेश्वराची भक्ती करतात, त्यांचा वरदहस्त त्यांच्यावर असतो आणि जे त्यांना सोडतात, त्यांच्यावरच अरिष्ट येते.”

  13. म्हणून आम्ही उपास केला आणि आमची काळजी घेण्याबद्दल परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्यांनी आमचे रक्षण केले.