मुख्य मजकुरावर जा

Good and Evil बद्दल बायबलमधील वचने: Conflict between

9 वचने · 3 पैलू

"Good and Evil" साठी शोधा

Conflict between बद्दल वचने

  1. नंतर बेडकासारखे दिसणारे तीन अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, पशूच्या तोंडातून व खोट्या संदेष्ट्यांच्या तोंडामधून निघताना मी पाहिले.

  2. चमत्कार करणारे हे दुरात्मे जगातील सर्व राजांकडे जाऊन सर्वसमर्थ परमेश्वराच्या दिवशी युद्धासाठी त्यांना एकत्र करतात.

  3. “पाहा! जसा चोर येतो तसा मी येईन! जे आपली वस्त्रे घालून तयार होऊन माझी वाट पाहत आहेत, ते धन्य! त्यांना नग्नावस्थेत आणि लज्जास्पद स्थितीत चालावे लागणार नाही.”

  4. मग त्या तिघांनी जगातील सर्व राजांना, हिब्रू भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले.

  5. मग सातव्या देवदूताने आपली वाटी अंतराळात ओतली; तेव्हा मंदिरात असलेल्या राजासनावरून एक मोठी वाणी निघाली. ती म्हणाली, “पूर्ण झाले आहे!”

  6. मग मेघगर्जना, व आकाश दणाणून सोडणारा गडगडाट झाला. विजा चमकल्या आणि मानवी इतिहासात कधी झाला नव्हता इतका मोठा व तीव्र स्वरुपाचा भूमिकंप झाला.

  7. त्या मोठ्या शहराचे तीन भाग झाले. राष्ट्रांची नगरे उद्ध्वस्त झाली. महान बाबिलोन नगरीचे परमेश्वराला स्मरण झाले व त्यांनी तिला त्यांचा क्रोधरूपी द्राक्षारसाचा प्याला प्यावयास लावला.

  8. प्रत्येक बेट नाहीसे झाले; पर्वत सपाट झाले.

  9. प्रत्येकी सुमारे पन्नास कि.ग्रॅ. वजनाच्या प्रचंड गारा आकाशातून माणसांवर पडल्या. गारांच्या पीडांमुळे लोकांनी परमेश्वराला शाप दिले, कारण त्या गारांची पीडा फार भयानक होती.