Gold बद्दल बायबलमधील वचने: Priestly and royal garments adorned with
Priestly and royal garments adorned with बद्दल वचने
त्यांनी जी वस्त्रे बनवावी ती ही: ऊरपट, एफोद, एक झगा, भरतकाम केलेला अंगरखा, फेटा व कमरबंद. त्यांनी ही पवित्र वस्त्रे तुझा भाऊ अहरोन व त्याच्या पुत्रांसाठी बनवावी, यासाठी की याजक म्हणून त्यांनी माझी सेवा करावी.
त्यांनी सोन्याचा आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या सुताचा व रेशमी तागाचा वापर करावा.
“एफोद सोन्याचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि बारीक कातलेल्या रेशमी तागाचा, कुशल कारागिराच्या हातांनी बनवा.