Skip to content

Fish बद्दल बायबलमधील वचने

18 वचने · 6 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. आणि परमेश्वराने म्हटले, “जलांमध्ये विपुल प्रमाणात जीवजंतू उत्पन्न होवोत आणि पक्षी पृथ्वीवर आकाशमंडळात विहार करोत.”

  2. सागरांमधील महाकाय प्राणी, तसेच जलांमध्ये संचार करणारे व सर्व जातीचे प्राणी त्यांनी उत्पन्न केले. तसेच पंख असलेले सर्व जातीचे पक्षीही त्यांनी उत्पन्न केले. परमेश्वराने पाहिले की हे चांगले आहे.

  3. परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला आणि ते म्हणाले, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, समुद्रातील जले भरून टाका आणि पृथ्वीवर पक्ष्यांची वृद्धी होवो.”

  4. पृथ्वीवरील प्रत्येक प्राणी आणि आकाशातील प्रत्येक पक्षी, जमिनीवर सरपटणारे प्रत्येक प्राणी आणि समुद्रातील सर्व मासे यांना तुमचे भय व दहशत वाटेल, कारण मी त्यांना तुमच्या ताब्यात दिले आहे;

  5. जे काही सजीव आहे आणि पृथ्वीवर वावरते ते तुमचे अन्न असेल. धान्य व वनस्पती याबरोबरच आता ते सर्व मी तुमच्या स्वाधीन करतो.

  6. “समुद्राच्या आणि नद्यांच्या पाण्यात राहणार्‍या सर्व प्राण्यांपैकी तुम्ही कल्ले आणि खवले असलेले कोणतेही प्राणी खाऊ शकता.

  7. पण ज्यांना कल्ले व खवले नाहीत—मग ते समुद्रात राहणारे वा इतर जलचर असोत—असे सर्व मासे तुम्हाला निर्विवाद अशुद्ध असून निषिद्ध आहेत.

  8. तुम्ही ते अशुद्ध समजावे व ते खाऊ नयेत किंवा त्यांच्या मृतशरीरांना स्पर्शही करू नये.

  9. ज्यांना कल्ले व खवले नाहीत असा प्रत्येक जलचर प्राणी तुम्हाला निषिद्ध आहे.

  10. पाण्यात राहणार्‍या सर्व प्राण्यांपैकी ज्यांना कल्ले व खवले आहेत, त्यांना तुम्ही खाऊ शकता.

  11. परंतु ज्यांना कल्ले व खवले नाहीत ते तुम्ही खाऊ नये; तुमच्यासाठी ते अशुद्ध आहे.

  12. जिथे पाणी वाहील, तिथे जिवंत प्राण्यांचे थवे राहतील. तिथे पुष्कळ मासे असतील, कारण ते पाणी तिथे वाहत जाऊन खारट पाणी गोड करते; म्हणून जिथे नदी वाहते तिथे सर्वकाही जिवंत राहेल.

  13. तिच्या किनारी मासेमारी करणारे उभे राहतील; एन-गेदीपासून एन-एग्लाइमपर्यंत जाळे पसरविण्यासाठी जागा असेल. भूमध्य समुद्रातील माशांप्रमाणे तिथे पुष्कळ प्रकारचे मासे असतील.

  14. मग काठावर उतरल्यावर, त्यांनी कोळशाचा विस्तव पाहिला, त्यावर मासळी व काही भाकरी ठेवल्या होत्या.

  15. येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही आता धरलेल्या मासळीतून काही आणा.”

  16. शिमोन पेत्राने परत मचव्यावर चढून जाळे काठावर ओढून आणले. त्याने मोजल्याप्रमाणे त्यात एकशे त्रेपन्न मोठे मासे होते आणि इतके असूनही ते जाळे फाटले नव्हते.

  17. येशू त्यांना म्हणाले, “या आणि न्याहरी करा.” आपण कोण आहात? असे विचारण्याचे त्यांच्या शिष्यांपैकी एकालाही धैर्य झाले नाही, परंतु ते प्रभू आहे हे त्यांना माहीत होते.

  18. मग येशू आले, त्यांनी भाकर घेऊन त्यांना दिली व मासळीचेही त्यांनी तसेच केले.