Fish बद्दल बायबलमधील वचने: Clean and unclean
Clean and unclean बद्दल वचने
“समुद्राच्या आणि नद्यांच्या पाण्यात राहणार्या सर्व प्राण्यांपैकी तुम्ही कल्ले आणि खवले असलेले कोणतेही प्राणी खाऊ शकता.
पण ज्यांना कल्ले व खवले नाहीत—मग ते समुद्रात राहणारे वा इतर जलचर असोत—असे सर्व मासे तुम्हाला निर्विवाद अशुद्ध असून निषिद्ध आहेत.
तुम्ही ते अशुद्ध समजावे व ते खाऊ नयेत किंवा त्यांच्या मृतशरीरांना स्पर्शही करू नये.
ज्यांना कल्ले व खवले नाहीत असा प्रत्येक जलचर प्राणी तुम्हाला निषिद्ध आहे.
पाण्यात राहणार्या सर्व प्राण्यांपैकी ज्यांना कल्ले व खवले आहेत, त्यांना तुम्ही खाऊ शकता.
परंतु ज्यांना कल्ले व खवले नाहीत ते तुम्ही खाऊ नये; तुमच्यासाठी ते अशुद्ध आहे.