मुख्य मजकुरावर जा

Fear of God बद्दल बायबलमधील वचने: Reverence

22 वचने · 2 पैलू

Reverence बद्दल वचने

  1. जेव्हा लोकांनी विजा पाहिल्या आणि गडगडाट व तुतारीचा आवाज ऐकला आणि धुराने भरलेला पर्वत पाहिला, ते भीतीने कंपित झाले व दूर उभे राहिले

  2. आणि ते मोशेला म्हणाले, “तुम्ही स्वतः आमच्याशी बोला आणि आम्ही ऐकू. पण परमेश्वराला मात्र आमच्याशी बोलू देऊ नका, नाहीतर आम्ही मरून जाऊ.”

  3. मोशे लोकांना म्हणाला, “घाबरू नका. तुमची परीक्षा पाहावी म्हणून परमेश्वर आले आहेत, अशासाठी की परमेश्वराचे भय तुम्हाला पापापासून दूर ठेवण्याकरिता तुमच्याबरोबर असावे.”

  4. याहवेह तुमच्या परमेश्वराचे तुम्ही भय बाळगा, त्यांची सेवा करा, त्यांना बिलगून राहा आणि त्यांच्याच नावाने शपथ घ्या.

  5. तेच तुमच्या स्तुतीचा विषय आहे; तेच तुमचे परमेश्वर आहेत, त्यांनी केलेले महान व भयावह चमत्कार तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिले आहेत.

  6. याहवेहला भिऊन वागणारा मनुष्य कोण आहे? याहवेह, त्याने ज्या मार्गाने जावे, त्या मार्गाचे शिक्षण त्याला देतील.

  7. ते समृद्धीत आपले दिवस व्यतीत करतील आणि त्यांची संतती पृथ्वीचे वतन पावतील.

  8. याहवेहचे भय धरणार्‍यांवर ते आपली रहस्ये प्रगट करतात; त्यांनाच ते आपला करार जाहीर करतात.

  9. याहवेहचा आदर मनुष्याचा दृढ गड आहे, आणि त्याच्या मुलाबाळांना सुरक्षित आश्रयस्थान लाभते.

  10. याहवेहचे भय म्हणजे जीवनाचा झरा आहे, ते मृत्यूच्या पाशांपासून त्याला वाचवते.

  11. जेव्हा याहवेह पृथ्वीला हलविण्यासाठी उभे राहतील तेव्हा त्यांच्या भयावह सान्निध्यापासून आणि गौरवी प्रतापापासून वाचण्यास लोक खडकांच्या गुहांकडे धाव घेतील आणि जमिनीतील खाचात लपतील.

  12. त्या दिवशी लोक उपासना करण्यासाठी त्यांनी घडविलेल्या त्यांच्या चांदी व सोन्याच्या मूर्ती चिचुंद्र्या आणि वटवाघळे यांच्यापुढे फेकून देतील.

  13. जेव्हा याहवेह पृथ्वीला हलविण्यासाठी उभे राहतील तेव्हा त्यांच्या भयावह सान्निध्यापासून आणि गौरवी प्रतापापासून वाचण्यास लोक खडकांच्या गुहांकडे धाव घेतील डोंगराच्या लटकत्या कडांमध्ये लपतील.

  14. मी त्यांना एकनिष्ठ अंतःकरण व एकमात्र कार्य देईन, जेणेकरून ते नेहमी माझे भय धरतील आणि त्यांचे व त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाबाळांचे सर्वदा कल्याण होईल.

  15. मी त्यांच्याबरोबर अनंतकाळचा करार करेन: मी त्यांचे कल्याण करणे कधीही थांबविणार नाही, त्यांना माझे भय धरण्यास प्रोत्साहित करेन, जेणेकरून ते माझ्यापासून कधीही विमुख होणार नाहीत.

  16. राष्ट्रे हे पाहतील आणि लज्जित होतील, त्यांच्या सत्तेपासून वंचित राहतील. ते आपली मुखे हाताने झाकतील आणि त्यांचे कान बहिरे होतील.

  17. ते सर्पाप्रमाणे, भूमीवर सरपटणार्‍या प्राण्यांप्रमाणे धूळ चाटतील. ते आपल्या बिळातून थरथर कापत बाहेर पडतील; भयभीत होऊन ते याहवेह आमच्या परमेश्वराकडे वळतील आणि तुमचे भय बाळगतील.

  18. आपल्याला असे अविचल राज्य प्राप्त होणार आहे, तेव्हा कृतज्ञ अंतःकरणांनी आणि आदरयुक्त भय बाळगून आपण परमेश्वराची उपासना करू या.

  19. कारण आपले “परमेश्वर भस्म करणारे अग्नी आहेत.”

  20. परमेश्वराची प्रीती आपल्यावर आहे, ती आपण ओळखतो आणि तिच्यावर अवलंबून राहतो. परमेश्वर प्रीती आहेत. जे प्रीतीत राहतात ते परमेश्वरामध्ये राहतात आणि परमेश्वर त्यांच्यामध्ये राहतात.

  21. अशा रीतीने प्रीती आपल्यामध्ये पूर्ण होते, यासाठी की न्यायाच्या दिवशी आपल्याला असा आत्मविश्वास प्राप्त व्हावाः या जगात आपण येशू सारखे आहोत.

  22. प्रीतीमध्ये भय नसते. पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते, कारण भीतीमध्ये शासन असते. जो भीती बाळगतो तो प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नसतो.