Skip to content

Eleazer बद्दल बायबलमधील वचने

6 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. म्हणून किर्याथ-यआरीमचे लोक आले आणि त्यांनी याहवेहचा कोश घेऊन टेकडीवर अबीनादाबाच्या घरी नेऊन ठेवला व कोशाचे राखण करण्यासाठी अबीनादाबाचा पुत्र एलअज़ार याला पवित्र केले.

  2. कोश किर्याथ-यआरीम येथे पुष्कळ काळ—म्हणजेच वीस वर्षे राहिला. तेव्हा सर्व इस्राएली लोक याहवेहकडे परत फिरले.

  3. त्याच्यानंतर अहोहचा रहिवासी दोदोचा पुत्र एलअज़ार होता. तो तीन पराक्रमी योद्ध्यांपैकी एक होता. पस-दम्मीम येथे युद्धासाठी एकत्र आलेल्या पलिष्ट्यांना टोमणे मारत जो दावीदाबरोबर होता. तेव्हा इस्राएल लोक माघारी गेले होते,

  4. परंतु एलअज़ार युद्धभूमीवर राहून, त्याचा हात थकेपर्यंत व तलवारीला त्याचा हात चिकटून जाईपर्यंत त्याने पलिष्ट्यांना ठार मारले होते. त्या दिवशी याहवेहने त्यांना मोठा विजय प्राप्त करून दिला. सैन्य पुन्हा एलअज़ारकडे आले ते केवळ मेलेल्यांना लुटायला.

  5. मरारीचे पुत्र: महली व मूशी. महलीचे पुत्र: एलअज़ार व कीश.

  6. एलअज़ारला पुत्र नव्हता: त्याला फक्त कन्याच होत्या. त्यांचे चुलतभाऊ कीशपुत्र यांनी त्यांच्याशी विवाह केले.