Cuth बद्दल बायबलमधील वचने: Called also Cuthah. A district of Asia, from which colonists were transported to Samaria.
Called also Cuthah. A district of Asia, from which colonists were transported to Samaria. बद्दल वचने
मग अश्शूरच्या राजाने बाबेलच्या, कूथाह, अव्वा, हमाथ व सफरवाईम येथील लोकांच्या वसाहती हालवून त्यांना शोमरोनात इस्राएलांच्या जागी वसाहती करावयास लावल्या. त्यांनी शोमरोन ताब्यात घेतला आणि त्या नगरात राहू लागले.
जेव्हा ते तिथे राहू लागले, प्रारंभी त्यांनी याहवेहची उपासना केली नाही; म्हणून त्यांनी सिंहांना त्यांच्यामध्ये पाठवून त्यांच्यापैकी काही जणांना ठार केले.
अश्शूरच्या राजाकडे याचा निरोप सांगण्यात आला: “ज्या लोकांना तुम्ही त्यांच्या देशातून हाकलून दिले आणि शोमरोनच्या नगरांत स्थायिक केले त्यांना त्या देशाच्या देवाला काय हवे हे माहीत नाही. त्यांनी त्यांच्यामध्ये सिंहांना पाठविले जे त्यांना ठार मारीत आहेत, कारण देवाला काय हवे हे त्या लोकांना माहीत नाही.”
तेव्हा अश्शूरच्या राजाने हे फर्मान काढले: “शोमरोनामधून बंदिवान करून आणलेल्या याजकांपैकी एका याजकाला तिथे पाठवा, जेणेकरून तो तिथे राहील आणि लोकांना त्या देशातील देवाला काय हवे ते शिकविल.”
म्हणून शोमरोनातून बंदिवासात पाठविलेला एक याजक बेथेल येथे राहायला आला आणि त्याने त्यांना याहवेहची उपासना कशी करावी हे शिकविले.
तरीसुद्धा, प्रत्येक राष्ट्रांतून आलेल्या लोकांनी आपआपले दैवत बनविले, आणि शोमरोनी लोकांनी बांधलेल्या उच्चस्थानी त्यांची स्थापना केली, प्रत्येक राष्ट्रांतून आलेल्या लोकांनी आपआपल्या नगरात असेच केले.
बाबेलमधील लोकांनी सुक्कोथ-बनोथ मूर्ती केली. कूथमधील लोकांनी नेरगल केला व हमाथातील लोकांनी अशीमा केली;