Skip to content

Covetousness बद्दल बायबलमधील वचने: Lying

4 वचने · 49 पैलू

Lying बद्दल वचने

  1. गेहजी म्हणाला, “सर्वकाही ठीक आहे. माझ्या धन्याने मला तुमच्याकडे हे सांगण्यास पाठविले आहे, ‘एफ्राईमच्या डोंगराळ भागातून संदेष्ट्यांच्या समुहातून दोन तरुण संदेष्टे आताच आले आहेत. कृपया त्यांना देण्यासाठी चांदीची एक तालांत व पोशाखांचे दोन जोड हवे आहेत.’ ”

  2. नामान म्हणाला, “तू आनंदाने दोन तालांत घेऊन जा.” त्याने ते स्वीकारण्याची त्याला विनंती केली आणि मग ती चांदी आणि पोशाखांच्या दोन थैल्या बांधून दिल्या. त्याने ते आपल्या दोन सेवकांना दिले आणि ते त्याच्यापुढे निघाले.

  3. जेव्हा गेहजी डोंगराजवळ आला तेव्हा त्याने सेवकांकडून त्या थैल्या घेतल्या आणि त्या आपल्या घरी ठेवून दिल्या. त्याने त्या माणसांना परत पाठवून दिले आणि ते निघून गेले.

  4. गेहजी आपल्या धन्याच्या पुढे जाऊन उभा राहिला, तेव्हा अलीशाने त्याला विचारले, “गेहजी, तू कुठे गेला होतास?” गेहजीने उत्तर दिले, “तुमचा सेवक कुठेच गेला नव्हता.”