मुख्य मजकुरावर जा

Confession of Sin बद्दल बायबलमधील वचने

10 वचने · 24 पैलू

"Confession of Sin" साठी शोधा

प्रमुख बायबल वचने

  1. “ ‘परंतु जर ते आपल्या पापांची व आपल्या वाडवडिलांच्या पापांची—त्यांच्या अविश्वासूपणाची आणि माझ्याविरुद्ध चालण्याची कबुली देतील,

  2. ज्यामुळे मी त्यांचा शत्रू झालो व त्यांना शत्रूच्या भूमीत घेऊन गेलो—नंतर जेव्हा त्यांची सुंता न झालेली हट्टी अंतःकरणे नम्र होतील आणि त्यांच्या पापाची शिक्षा ते भोगतील,

  3. तेव्हा मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याबरोबर केलेल्या कराराचे स्मरण करेन आणि त्या भूमीचे स्मरण करेन.

  4. जरी आमची पापे आमच्याविरुद्ध साक्ष देतात, तरी हे याहवेह, तुमच्या नामाखातर तुम्ही काहीतरी करा. आम्ही तुमच्याविरुद्ध नेहमी बंडखोरी केली आहे; आम्ही तुमच्याविरुद्ध घोर पातक केले आहे!

  5. तुम्हीच इस्राएलची आशा आहात, संकटसमयीच्या आमच्या त्रात्या, तुम्ही या देशात आमच्याशी परकेपणाने का वागता, केवळ रात्रभर मुक्काम करणार्‍या वाटसरूसारखे का झाला आहात?

  6. एखाद्या विस्मित झालेल्या व्यक्तीसारखे तुम्ही का आहात? एखाद्या वाचविण्यास अशक्त योद्ध्याप्रमाणे? हे याहवेह, तुम्ही तर येथेच आमच्यामध्ये आहात, आम्ही तुमचे नाव धारण केले आहे; आमचा त्याग करू नका!

  7. जेव्हा मी माझे पाप आणि आपल्या इस्राएली लोकांचे पाप कबूल करीत बोलत आणि प्रार्थना करीत होतो आणि याहवेह माझ्या परमेश्वर यांची त्यांच्या पवित्र डोंगरासाठी प्रार्थना करीत होतो;

  8. जेव्हा मी प्रार्थना करीतच होतो, गब्रीएल ज्याला मी आधीच्या दृष्टान्तात पाहिले होते, संध्याकाळच्या अर्पणासमयी माझ्याकडे आला;

  9. त्याने मला समज दिली आणि मला म्हटले, “दानीएला, आता मी तुला ज्ञान आणि समज देण्यासाठी आलो आहे.

  10. ज्या क्षणाला तू प्रार्थना करण्यास सुरुवात केलीस, त्याच क्षणाला एक आज्ञा देण्यात आली, ती काय आहे हे तुला सांगण्यासाठीच मी आलो आहे. कारण तू अतिशय प्रिय आहेस. म्हणून या गोष्टींचा विचार कर आणि दृष्टान्त नीट समजून घे: