मुख्य मजकुरावर जा

Common People बद्दल बायबलमधील वचने

5 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. येशूंनी या गोष्टी सांगण्याचे संपविले, तेव्हा समुदाय त्यांच्या शिकवणीवरून थक्क झाले.

  2. प्रत्यक्ष घडलेला हा चमत्कार पाहून जमावाला भीती वाटली व ज्यांनी मनुष्यास असा अधिकार दिला त्या परमेश्वराची त्या सर्वांनी स्तुती केली.

  3. येशूंनी तो दुरात्मा त्याच्यामधून हाकलून लावला, तेव्हा त्या मुक्या मनुष्याला बोलता येऊ लागले. ते पाहून गर्दीतील लोक आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “असा अद्भुत प्रकार इस्राएलात आम्ही कधीच पाहिला नव्हता.”

  4. स्वतःच्या गावी येऊन, तेथील सभागृहामध्ये असलेल्या लोकांना त्यांनी शिकविण्यास सुरुवात केली आणि ते सर्व आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, “या मनुष्याला हे ज्ञान व चमत्कार करण्याचे सामर्थ्य कुठून प्राप्त झाले?

  5. शब्बाथ आला त्यावेळी त्यांनी तेथील सभागृहामध्ये असलेल्या लोकांना शिक्षण देण्यास सुरुवात केली आणि ज्या सर्वांनी त्यांचे शिक्षण ऐकले ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, “या मनुष्याला हे कुठून प्राप्त झाले? कशाप्रकारचे हे सुज्ञान त्यांना देण्यात आले आहे? हा अद्भुत चमत्कारसुद्धा कसे करतो?