Captive बद्दल बायबलमधील वचने: Kindness to
Kindness to बद्दल वचने
यहूदीयाचा राजा यहोयाखीनच्या बंदिवासातील सदतिसाव्या वर्षी, एवील-मरोदख हा बाबेलचा राजा झाला, तेव्हा त्याने यहूदीयाचा राजा यहोयाखीनची बंदिवासातून सुटका केली. त्याने हे बाराव्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी केले.
तो त्याच्याशी कृपेने बोलला आणि त्याचे राजासन जे राजे त्याच्यासोबत बाबेल येथे होते, त्यांच्या राजासनापेक्षा उंच केले.
यहोयाखीनने तुरुंगातील कपड्यांचा त्याग केला आणि आयुष्यभर राजाच्या मेजावर भोजन केले.
यहोयाखीन जिवंत असेपर्यंत राजा त्याला प्रती दिवस नियमित पुरवठा करीत असे.