मुख्य मजकुरावर जा

Calf बद्दल बायबलमधील वचने: Prophecies against the golden calves at Beth-El

9 वचने · 7 पैलू

Prophecies against the golden calves at Beth-El बद्दल वचने

  1. याहवेहच्या वचनानुसार परमेश्वराचा एक मनुष्य यहूदीयावरून बेथेलास आला, जेव्हा यरोबोअम अर्पण करण्यासाठी वेदीजवळ उभा होता.

  2. याहवेहच्या वचनानुसार तो वेदीविरुद्ध ओरडला: “वेदी, हे वेदी! याहवेह असे म्हणतात: ‘दावीदाच्या घराण्यात योशीयाह नावाचा पुत्र जन्माला येईल. जे याजक तुझ्यावर येथे यज्ञ करतात, त्यांचे यज्ञ तो तुझ्यावर करेल, मनुष्यांची हाडे तुझ्यावर जाळली जातील.’ ”

  3. त्याच दिवशी परमेश्वराच्या मनुष्याने एक चिन्ह दिले: “याहवेहने हेच चिन्ह जाहीर केले आहे: वेदी दुभागली जाईल आणि त्यावरील राख ओतली जाईल.”

  4. जेव्हा यरोबोअम राजाने परमेश्वराच्या मनुष्याने बेथेलात वेदीविरुद्ध जे काही सांगितले ते ऐकले, तेव्हा वेदीवरून आपला हात पुढे करून तो म्हणाला, “त्याला पकडा!” परंतु जो हात त्याने पुढे केला होता, तो वाळून गेला आणि त्याला तो मागे घेता येईना.

  5. आणि याहवेहच्या वचनानुसार परमेश्वराच्या मनुष्याने जे चिन्ह दिले त्यानुसार वेदी दुभागली व वेदीवरील राख ओतली गेली.

  6. हे शोमरोना, तुझी वासराची मूर्ती फेकून दे! त्यांच्याविरुद्ध माझा राग पेटला आहे. ते अजून किती काळ शुद्ध होण्यास असमर्थ राहतील?

  7. ते इस्राएलाकडून आहे! हे वासरू—एका कारागिराने बनविले आहे; तो परमेश्वर नाही. शोमरोनाच्या या वासराचे तुकडे तुकडे करण्यात येतील.

  8. शोमरोनात राहणारे लोक बेथ-आवेनच्या वासरूच्या मूर्तीला घाबरतात. त्याचे लोक त्याच्यासाठी शोक करतील आणि त्याचप्रमाणे त्याचे मूर्तिपूजक पुजारी करतील, जे पूर्वी त्याच्या वैभवात आनंदित होते. कारण ते वैभव त्यांच्याकडून हिसकावून त्यांना बंदिवासात नेण्यात आले आहे.

  9. महान राजाला भेट म्हणून सादर करण्यासाठी ते अश्शूरला नेले जातील. एफ्राईमला लज्जित केले जाईल; बाहेरील लोकांशी संबंध ठेवल्यामुळे इस्राएलही आपल्या मसलतीविषयी लज्जित होईल.