Bezaleel बद्दल बायबलमधील वचने: 1. A divinely inspired mechanic and master workman, who built the tabernacle
1. A divinely inspired mechanic and master workman, who built the tabernacle बद्दल वचने
मग मोशे इस्राएली लोकांना म्हणाला, “पाहा, याहवेहने यहूदाहच्या गोत्रातील, हूराचा पुत्र, उरी याचा पुत्र बसालेल याला निवडले आहे,
आणि याहवेहने त्याला परमेश्वराचा आत्मा, ज्ञान, समज, बुद्धी आणि सर्वप्रकारच्या कुशलतेने भरले आहे—
सोने, चांदी आणि कास्याचे कलाकौशल्य करावे,
आणि पाषाण फोडून रत्ने घडवावी, लाकडाचे काम आणि सर्वप्रकारचे कलात्मक कारागिरीचे काम करावे.
आणि याहवेहने त्याला व दान गोत्रातील अहीसामाक याचा पुत्र ओहोलियाब या दोघांना इतरांनाही शिकविण्याची क्षमता दिली आहे.
याहवेहने त्यांना सर्वप्रकारचे कोरीव काम, कारागिरीचे काम, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सुती व रेशमी तागावर भरतकाम, विणकाम; अशा सर्वप्रकारच्या विणकरांना कारागिरीचे—कौशल्याचे—काम करण्याच्या दानांनी भरले आहे.
त्यांनी बाभळीच्या लाकडाची होमार्पणाची वेदी तयार केली. ती तीन हात उंच, पाच हात लांब, पाच हात रुंद असून चौकोनी होती.
मग त्यांनी वेदीच्या चार कोपर्यांना प्रत्येकी एक शिंग बनविले, शिंगे व वेदी अखंड बनविली व वेदीला कास्याचे आवरण घातले.
वेदीची सर्व पात्रे, म्हणजे त्याचे भांडे, फावडे, शिंपडण्याचे भांडे, मांसाचे काटे आणि अग्निपात्रे कास्याचे बनविले.
त्यांनी वेदीसाठी कास्याच्या जाळीची चाळण तयार केली, जी वेदीच्या काठाखाली वेदीच्या अर्ध्या उंचीपर्यंत होती.
त्यांनी कास्याच्या चाळणीच्या चार कोपर्यांना दांडे अडकविण्यासाठी ओतीव कास्याच्या कड्या तयार केल्या.
त्यांनी बाभळीच्या लाकडाचे दांडे तयार करून त्यांना कास्याचे आवरण घातले.
त्यांनी ते दांडे कड्यात अडकविले, म्हणजे वेदी वाहून नेताना दांडे वेदीच्या दोन बाजूंनी असतील. वेदी लाकडाची असून ती आतून पोकळ बनविली.