Anointing बद्दल बायबलमधील वचने: Symbolic, of Jesus
Symbolic, of Jesus बद्दल वचने
तिथे ते जेवायला बसले असताना, एक स्त्री अतिशय मोलवान सुगंधी तेल असलेली एक अलाबास्त्र कुपी घेऊन आत आली आणि तिने ते बसले असताना येशूंच्या मस्तकावर तेल ओतले.
जेव्हा शिष्यांनी हे पाहिले त्यावेळी ते संतापले. ते म्हणाले, “ही नासाडी कशाला?
हे तेल अधिक किमतीस विकून ते पैसे गोरगरिबांना देता आले असते.”
हे जाणून येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही या स्त्रीला त्रास का देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे.
गरीब लोक तर नेहमीच तुमच्याबरोबर असतील, परंतु मी तुमच्याबरोबर नेहमीच असणार नाही.
माझ्या अंत्यविधीची तयारी म्हणून तिने हे तेल माझ्या शरीरावर ओतले आहे.
मरीयेने अर्धा शेर, शुद्ध जटामांसीचे मोलवान सुगंधी तेल; येशूंच्या पायावर ओतले आणि तिने त्यांचे पाय आपल्या केसांनी पुसले आणि त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले.
परंतु येशूंच्या शिष्यांपैकी एकजण, यहूदाह इस्कर्योत जो येशूंचा विश्वासघात करणार होता, त्याने विरोध केला,
“वास्तविक ते तेल विकून येणारे पैसे गोरगरिबांना देता आले नसते का? त्या तेलाचे मोल एका वर्षाच्या मजुरीएवढे होते.”
त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो असे म्हणाला नाही, तर तो चोर होता; व पैशाच्या पिशवीचा मालक असून, जे काही त्यात टाकले जाई त्यातून स्वतःसाठी काढून घेत असे.
त्यावर येशू म्हणाले, “तिला असू दे, माझ्या उत्तरक्रियेसाठी सुगंधी तेल तिने बचत करून ठेवले होते.