Alpha बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
पुरातन काळापासून पिढ्यांना कोणी पाचारण केले व हे घडवून आणले? मी, याहवेह—मी आदि आहे, मी अंत आहे—तो मीच आहे.”
“सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचा राजा व उद्धारक, याहवेह असे म्हणतात— मी आदि व अंत आहे. माझ्याशिवाय इतर कोणीही परमेश्वर नाही.
“याकोबा, मी ज्यांना बोलाविले, त्या इस्राएला, माझे ऐक, मीच परमेश्वर आहे; मीच आदि आणि मीच अंत आहे.
प्रभू परमेश्वर म्हणतात, “मीच अल्फा व ओमेगा, जे होते आणि जे येणार आहेत, ते सर्वसमर्थ परमेश्वर आहेत.”
तो म्हणाला: “तुला जे दिसते, ते एका ग्रंथपटावर लिहून काढ आणि ते इफिस, स्मुर्णा, पर्गमम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया या सात मंडळ्यांना पाठव.”
ते मला म्हणाले, “सर्वकाही पूर्ण झाले आहे! मीच अल्फा व ओमेगा, प्रारंभ आणि शेवट आहे. तान्हेल्या सर्व लोकांना मी जीवनाच्या झर्याचे पाणी मोफत देईन.
मीच अल्फा व ओमेगा, प्रारंभ आणि शेवट, आदि व अंत आहे.