Skip to content

Achsah बद्दल बायबलमधील वचने

10 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. आणि कालेब म्हणाला, “जो पुरुष किर्याथ-सेफरवर स्वारी करून ते हस्तगत करेल, त्याला मी आपली कन्या अक्साह ही पत्नी म्हणून देईन.”

  2. कालेबाचा भाऊ केनाजचा पुत्र ओथनिएलाने ते जिंकून घेतले, म्हणून कालेबाने आपली कन्या अक्साह त्याला पत्नी म्हणून दिली.

  3. एक दिवस जेव्हा ती ओथनिएलकडे आली, तेव्हा तिने तिच्या वडिलांना एक शेत देण्याची त्याला विनंती केली. जेव्हा ती गाढवावरून उतरली, तेव्हा कालेबाने तिला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे?”

  4. तिने उत्तर दिले, “माझ्यावर विशेष कृपा करा. तुम्ही मला नेगेव प्रांतात जमीन दिलेली आहेच, मला पाण्याचे झरेही द्या.” म्हणून कालेबाने तिला वरचे आणि खालचे झरे दिले.

  5. त्यानंतर यहूदाह डोंगराळ प्रदेशात, नेगेव आणि पश्चिमेकडील पायथ्याशी राहणाऱ्या कनानी लोकांशी युद्ध करण्यास उतरले.

  6. मग त्या हेब्रोनात (ज्याला पूर्वी किर्याथ-अर्बा म्हणत) राहणार्‍या कनान्यांवर यहूदाहने हल्ला केला आणि त्यांनी शेशय, अहीमान, व तलमय यांचा पराभव केला.

  7. तिथून त्यांनी दबीरमध्ये (पूर्वी दबीरचे नाव किर्याथ-सेफर होते) राहणार्‍या लोकांवर हल्ला केला.

  8. कालेब म्हणाला, “जो पुरुष किर्याथ-सेफरवर स्वारी करून ते हस्तगत करेल, त्याला मी आपली कन्या अक्साह ही पत्नी म्हणून देईन.”

  9. कालेबाचा लहान भाऊ केनाजचा पुत्र ओथनिएलाने ते जिंकून घेतले; म्हणून कालेबाने आपली कन्या अक्साह पत्नी म्हणून त्याला दिली.

  10. याशिवाय तिला मदमन्नाहचा पिता शाफ, आणि मखबेना व गिबियाह यांचा पिता शेवा हे झाले; कालेबाची कन्या अक्साह होती.