मुख्य मजकुरावर जा

स्तोत्रसंहिता२५

मार्गदर्शन व संरक्षणासाठी प्रार्थना

दावीदाचे स्तोत्र. याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी तुमच्यावर भरवसा ठेवतो.
माझ्या परमेश्वरा मी तुमच्यावर भरवसा ठेवतो. मला लज्जित होऊ देऊ नका, माझ्या शत्रूंना मजवर विजयी होऊ देऊ नका.
जो कोणी तुमच्यावर आशा धरतो, तो कधीही लज्जित होणार नाही. पण जे विनाकारण उपद्रव देतात, ते सर्वजण लज्जित होतील.
याहवेह, मला तुमचे मार्ग दाखवा, तुमचे मार्ग मला शिकवा.
मला तुमच्या सत्यामध्ये चालवा आणि शिक्षण द्या; कारण मला तारणारे परमेश्वर तुम्हीच आहात, आणि दिवसभर माझी आशा तुम्हामध्ये आहे.
याहवेह, तुम्ही आपली महान कृपा व प्रीती स्मरण करा, ती सनातन काळापासून आहेत.
माझी तारुण्यातील पातके आणि बंडखोर वृत्ती आठवू नका; तुमच्या प्रीतीनुसार माझे स्मरण करा, कारण याहवेह, तुम्ही चांगले आहात.

देवाची चांगुलपणा नम्रांना मार्गदर्शन करतो

याहवेह चांगले आणि न्यायी आहेत; म्हणून ते पापी जनांस आपल्या मार्गांचे शिक्षण देतात.
ते नम्रजनांस नीतिमत्वाच्या मार्गावर नेतात, आणि त्यांना आपल्या मार्गाचे शिक्षण देतात.
१०
जे याहवेहचे करार आणि नियमशास्त्र पाळतात, त्यांच्यासाठी त्यांचे सर्व मार्ग प्रीतीचे आणि विश्वासयोग्य आहेत.
११
याहवेह, आपल्या नावाच्या गौरवासाठी माझे अपराध क्षमा करा, कारण ते घोर आहेत.

परमेश्वराचे भय बाळगण्याचे आशीर्वाद

१२
याहवेहला भिऊन वागणारा मनुष्य कोण आहे? याहवेह, त्याने ज्या मार्गाने जावे, त्या मार्गाचे शिक्षण त्याला देतील.
१३
ते समृद्धीत आपले दिवस व्यतीत करतील आणि त्यांची संतती पृथ्वीचे वतन पावतील.
१४
याहवेहचे भय धरणार्‍यांवर ते आपली रहस्ये प्रगट करतात; त्यांनाच ते आपला करार जाहीर करतात.
१५
माझे नेत्र याहवेहकडे लागलेले आहेत, कारण तेच माझे पाय जाळ्यातून सोडवतील.

सुटकेसाठी उत्कट विनंती

१६
याहवेह, माझ्याकडे वळून मजवर दया करा, कारण मी एकटा आणि पीडित आहे.
१७
माझ्या अंतःकरणातील यातना दूर करा आणि माझ्या तीव्र मनोवेदनेतून मला मुक्त करा.
१८
माझे क्लेश आणि माझ्या वेदना पाहा आणि माझ्या सर्व पातकांची क्षमा करा.
१९
पाहा, मला अनेक शत्रू आहेत आणि किती तीव्रपणे ते माझा द्वेष करतात.
२०
माझ्या जिवाचे रक्षण करा आणि मला वाचवा; मला लज्जित होऊ देऊ नका, कारण मी तुमच्या आश्रयास आलो आहे.
२१
सात्विकपणा व सरळपणा माझे रक्षण करो, कारण याहवेह, माझा भरवसा तुमच्यावर आहे.
२२
परमेश्वरा, इस्राएली राष्ट्राची, त्यांच्या सर्व त्रासातून मुक्तता करा!
Use arrow keys to navigate
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options