- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
अनुवाद१
Listen to this chapter
0:00
0:00
मोशेच्या भाषणाची पार्श्वभूमी
१
इस्राएली लोक यार्देन नदीच्या पूर्वेस असणार्या रानातील अराबा नावाच्या दरीमध्ये तळ देऊन राहिले होते, त्यावेळी मोशे जे बोलला त्या सर्व गोष्टीची नोंद या पुस्तकात केलेली आहे. या प्रदेशात सूफ, पारान, तोफेल, लाबान, हसेरोथ व दीजाहाब इत्यादी शहरांचा समावेश होतो.
२
(सेईर डोंगरमार्गे होरेब ते कादेश-बरनेआपर्यंतचा प्रवास अकरा दिवसाचा होता.)
३
चाळिसाव्या वर्षाच्या, अकराव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने इस्राएली लोकांना हे सर्व सांगितले.
४
हे मोशेने जाहीर करण्यापूर्वीच अमोर्यांचा राजा सीहोनाचा हेशबोन येथे पराभव करण्यात आला होता व एद्रेई जवळील अष्टारोथ येथे बाशानचा राजा ओगचाही पराभव करण्यात आला होता.
५
यार्देनच्या पूर्वेकडील मोआब प्रदेशात मोशे इस्राएली लोकांशी नियमांसंबंधी बोलला. तो म्हणाला:
होरेब सोडण्याची आज्ञा
६
आपल्या याहवेह परमेश्वरांनी चाळीस वर्षांपूर्वी होरेब येथे आपल्याला सांगितले होते, “तुम्ही या पर्वताजवळ खूप दिवस राहिलात;
७
आता तुम्ही येथून जा व अमोर्यांचा डोंगराळ प्रदेश, अराबाची दरी, नेगेव, कनान व लबानोन आणि भूमध्य समुद्रकिनार्यापासून ते फरात नदीच्या काठापर्यंत पसरलेल्या संपूर्ण प्रदेशात जाऊन वस्ती करा.
८
पाहा, मी हा सर्व प्रदेश तुम्हाला देत आहे. तुम्ही जा व तो प्रदेश हस्तगत करा. कारण याहवेहने तो प्रदेश अब्राहाम, इसहाक व याकोब या तुमच्या पूर्वजास व त्यांच्या वंशजास दिलेला वचनदत्त देश आहे.”
मोशे नेते आणि न्यायाधीश नेमतो
९
त्यावेळी मी तुम्हाला सांगितले होते, “माझ्या शक्तीपलीकडे असलेले मी एकट्यानेच वाहून नेणारे तुमचे मोठे ओझे माझ्यावर पडले आहे.
१०
कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमची संख्या आकाशातील तार्यांप्रमाणे अगणित केली आहे,
११
याहवेह तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वरांनी जे तुम्हाला अभिवचन दिले होते, त्यानुसार तुमची संख्या हजारपटीने वाढवो आणि तुम्हाला आशीर्वाद देवो!
१२
तुमच्या समस्या, तुमचे ओझे व तुमची भांडणे माझ्यासारखा एकटा मनुष्य कसा सोडवू शकेल?
१३
तेव्हा तुम्हीच प्रत्येक गोत्रांमधून सुज्ञ, समजूतदार व प्रतिष्ठित अशी काही माणसे निवडा, म्हणजे मी त्यांना तुमचे पुढारी नेमीन.”
१४
तुम्ही मला उत्तर देऊन म्हणाला, “तुम्ही जे करण्याचा प्रस्ताव दिला ते उत्तम आहे.”
१५
म्हणून मी तुमच्या प्रत्येक गोत्रांतून प्रमुख, ज्ञानी आणि आदरणीय पुरुष घेतले आणि त्यांना हजारांवर, शंभरांवर, पन्नासांवर व दहांवर प्रमुख व अधिकारी म्हणून नेमले.
१६
आणि त्यावेळी मी तुमच्या न्यायाधीशांना आज्ञा केली, “तुमच्या लोकांचा वाद ऐकून त्यावर न्याय करावा, मग तो दोन इस्राएली लोकांमधील असो किंवा इस्राएली आणि तुमच्यामध्ये राहणारे परदेशी यांच्यातील असो.
१७
न्याय करताना पक्षपातीपणा दाखवू नका; लहान व मोठे यांचे म्हणणे समानतेत ऐकून घ्या. कोणालाही घाबरू नका; कारण न्याय हा परमेश्वराकडूनच असतो. ज्या तक्रारी तुम्हाला सोडविण्यास कठीण वाटतील, त्या माझ्याकडे आणा आणि मी ऐकेन.”
१८
आणि त्यावेळी मी तुम्हाला जे काही करावयाचे आहे ते सर्व सांगितले होते.
कादेश-बर्णेथ येथील पापमय अपयश
१९
नंतर आम्ही होरेब येथून प्रस्थान केले व जो तुम्ही पाहिला होता अशा अफाट आणि भयानक अशा अरण्यातून प्रवास करीत, याहवेह आमच्या परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे शेवटी अमोर्यांच्या डोंगराळ प्रदेशात पोहोचलो आणि आम्ही कादेश-बरनेआस आलो.
२०
तेव्हा मी तुम्हाला सांगितले, “आता तुम्ही अमोर्यांच्या डोंगराळ प्रदेशात येऊन पोहोचला आहात, जो याहवेह आमचे परमेश्वर आम्हाला देणार आहेत.
२१
पाहा, याहवेह तुमच्या परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे. तुमच्या पूर्वजांचे देव परमेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे वर जा आणि तो आपल्या ताब्यात घ्या. घाबरू नका; निराश होऊ नका.”
२२
तेव्हा तुम्ही सर्व लोक माझ्याकडे आले आणि म्हणाले, “आधी आपण आपले हेर पाठवू म्हणजे कुठल्या मार्गाने त्या देशात प्रवेश करावा व त्यांची कोणती शहरे लागतील हे शोधून काढणे सोपे होईल.”
२३
ही गोष्ट मला चांगली वाटली; म्हणून मी प्रत्येक गोत्रातून एक असे बारा हेर निवडले.
२४
तिथून निघून ते डोंगराळ प्रदेशात पोहोचले आणि ते अष्कोल दरीपर्यंत आले व त्यांनी त्या प्रदेशाची पाहणी केली.
२५
तिथून परत येताना त्यांनी त्या ठिकाणची फळे आपल्याबरोबर आणली व असा अहवाल दिला: “जो देश याहवेह आमचे परमेश्वर आम्हाला देत आहेत तो खरोखरच चांगला आहे.”
२६
परंतु तुम्ही वर जाण्यास नाकारले व याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध बंड केले.
२७
आपल्या तंबूत बसून तुम्ही कुरकुर केली आणि म्हटले, “याहवेह आमचा द्वेष करीत आहेत, म्हणून अमोर्यांच्या हातून आमचा नाश व्हावा यासाठी त्यांनी आम्हाला इजिप्त देशातून इकडे आणले आहे.
२८
आम्ही आता कुठे जावे? आमच्या हेरबंधूंच्या वार्तेमुळे आम्ही भयभीत झालो आहोत. ते म्हणतात की, ‘त्या देशातील लोक आपल्यापेक्षा धिप्पाड आणि बलवान आहेत. त्यांची नगरे खूप मोठी असून नगरतट तर इतके उंच आहेत की ते जणू काही आकाशाला भिडले आहेत. आम्ही तिथे अनाकाचे वंशज देखील पाहिले आहेत.’ ”
२९
तेव्हा मी त्यांना म्हणालो, “असे भयभीत होऊ नका, त्यांना घाबरू नका.
३०
कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्यापुढे जात आहेत, ते तुमच्यावतीने त्यांच्याशी लढतील, जसे तुमच्या डोळ्यादेखत त्यांनी इजिप्त देशात आणि अरण्यात असताना केले. ज्याप्रमाणे पिता आपल्या मुलांची सर्वतोपरी काळजी घेतो, त्याप्रमाणे याहवेह परमेश्वराने इथे पोहोचेपर्यंत तुमची सतत काळजी घेतली.”
३२
पण तरीही तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचे नाकारले.
३३
ज्यांनी प्रवासात तुमच्यापुढे राहून रात्री अग्नीने आणि दिवसा मेघांनी तुमचे मार्गदर्शन केले, वाटेत विश्रांतीसाठी उत्तमोत्तम जागा निवडल्या, ते रात्री अग्नीने आणि दिवसा मेघांनी तुमचे मार्गदर्शन करीत.
३४
तुम्ही जे म्हटले ते याहवेहनी ऐकले आणि ते रागावले व त्यांनी शपथपूर्वक म्हटले:
३५
“या पिढीतील एकाच्याही दृष्टीस मी त्यांच्या पूर्वजांना वचनदत्त केलेली उत्तम भूमी पडू देणार नाही.
३६
परंतु यफुन्नेहचा पुत्र कालेब, जो मला पूर्णपणे अनुसरून चालला, त्याचे पाय ज्या भूमीला लागतील ती भूमी मी त्याच्या वंशजांना देईन, कारण तो याहवेहच्या मागे पूर्ण अंतःकरणाने चालला.”
३७
तुमच्यामुळे याहवेह माझ्यावरही रागावले व म्हणाले, “तू या वचनदत्त देशात प्रवेश करणार नाहीस.
३८
पण तुझा मदतनीस, नूनाचा पुत्र यहोशुआ प्रवेश करेल. तू त्याला प्रोत्साहन दे, कारण तो या वतनाचा ताबा घेण्यासाठी इस्राएली लोकांचे मार्गदर्शन करेल.
३९
जी बालके पारतंत्र्यात जातील असे तुम्ही म्हणता, ज्यांना त्यांचे बरेवाईटही कळत नाही, त्यांना मी तो देश बहाल करेन आणि ते त्याला आपल्या ताब्यात घेतील.
४०
परंतु तुम्ही मागे वळून वाळवंटातून तांबड्या समुद्राच्या वाटेने कूच करावे.”
४१
तेव्हा लोकांनी कबुली दिली, “आम्ही याहवेहविरुद्ध पाप केले आहे; आम्ही आमच्या वचनदत्त देशात जाऊ व तो मिळविण्यासाठी याहवेह परमेश्वराच्या आज्ञेनुसार आम्ही वर जाऊन लढाई करू.” असे म्हणून त्यांना आपली शस्त्रे सरसावली. त्यांना वाटले की हा सर्व डोंगराळ प्रदेश आपण सहज जिंकून घेऊ.
४२
परंतु याहवेह मला म्हणाले, “त्यांना सांग, ‘लढाई करण्यास वर जाऊ नका, कारण मी तुमच्याबरोबर राहणार नाही. तुमचा तुमच्या शत्रूकडून पराभव होईल.’ ”
४३
तुम्हाला मी तसे सांगितले, पण तुम्ही माझे ऐकले नाही. उलट पुन्हा याहवेहच्या आज्ञेविरुद्ध बंड केले आणि धिटाई करून त्या डोंगराळ देशात शत्रूवर चाल करून गेले.
४४
तिथे डोंगराळ देशात राहणार्या अमोर्यांनी तुमच्यावर चाल करून मधमाश्यांप्रमाणे सेईरपासून होरमाहपर्यंत तुमचा पाठलाग केला व तुम्हाला मार दिला.
४५
यानंतर तुम्ही परत येऊन याहवेहसमोर शोक करू लागलात, परंतु त्यांनी तुमच्या रडण्याकडे लक्ष दिले नाही.
४६
म्हणून तुम्ही कादेश येथेच दीर्घकाल राहिला, असे तुम्ही तिथे दिवस घालविले.
Use ← → arrow keys to navigate
Settings
Reading Style
Typeface
Font Size px
Options
Study Note