मुख्य मजकुरावर जा

2 इतिहास२७

योथामाचे नीतिमान राज्य

वयाच्या पंचवीसाव्या वर्षी योथाम राजा झाला आणि त्याने यरुशलेमात सोळा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यरुशा, ती सादोकची कन्या होती.
त्याचे पिता उज्जीयाहने जसे केले तसे त्यानेही याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले; परंतु त्याने याहवेहच्या मंदिरात प्रवेश केला नाही. तथापि लोकांनी त्यांचे भ्रष्ट व्यवहार सुरूच ठेवले.

योथामाची बांधकामे आणि लष्करी यश

योथामाने याहवेहच्या मंदिराचा वरील दरवाजा पुन्हा बांधला आणि ओफेलच्या डोंगरावरील भिंतीवर बरेच काम केले.
त्याने यहूदीयाच्या डोंगराळ प्रदेशात नगरे बांधली आणि जंगली भागात किल्ले आणि बुरूज बांधले.
योथामाने अम्मोन्यांच्या राजाशी युद्ध करून त्यांना जिंकले. त्या वर्षी अम्मोनी लोकांनी त्याला शंभर तालांत चांदी, दहा हजार कोर गहू आणि दहा हजार कोर जव दिले. अम्मोनी लोकांनी दुसऱ्या आणि तिसर्‍या वर्षी देखील त्याच प्रमाणात वस्तू आणल्या.
योथाम सामर्थ्याने वाढत गेला, कारण तो त्याचे परमेश्वर याहवेहसमोर स्थैर्याने चालला.

योथामाच्या राज्याचा समारोप

योथामच्या राज्यकाळातील इतर घटना, त्याने केलेली सर्व युद्धे आणि इतर गोष्टी इस्राएलचे राजे आणि यहूदीयाचे राजे यांच्या इतिहासात लिहिलेल्या आहेत.
वयाच्या पंचवीसाव्या वर्षी योथाम राजा झाला आणि त्याने यरुशलेमात सोळा वर्षे राज्य केले.
योथाम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या नगरात पुरण्यात आले. आणि त्याचा पुत्र आहाज त्याचा वारस म्हणून राजा झाला.
Use arrow keys to navigate
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options