1 शमुवेल८
Listen to this chapter
0:00
0:00
शमुवेलाचे पुत्र भ्रष्टपणे न्याय करतात
१
जेव्हा शमुवेल उतार वयाचा झाला, तेव्हा त्याने त्याच्या मुलांना इस्राएलचे पुढारी म्हणून नेमले.
२
त्याच्या प्रथमपुत्राचे नाव योएल आणि दुसर्याचे नाव अबीयाह असे होते आणि त्यांनी बेअर-शेबा येथे सेवा केली.
३
परंतु त्याच्या पुत्रांनी त्याचे अनुकरण केले नाही. ते अप्रामाणिकपणे लाभ मिळविण्याच्या मागे लागले आणि लाच स्वीकारून विपरीत न्याय करत.
इस्राएल राजाची मागणी करतो
४
म्हणून इस्राएलचे सर्व पुढारी एकत्र झाले आणि रामाह येथे शमुवेलकडे आले.
५
ते शमुवेलला म्हणाले, “तुम्ही वृद्ध झाला आहात आणि तुमचे पुत्र तुमच्या मार्गाने चालत नाहीत; तर आता जसे इतर राष्ट्रांना आहे त्याप्रमाणे आमचेही नेतृत्व करण्यासाठी एक राजा नेमून द्यावा.”
६
परंतु जेव्हा ते म्हणाले, “आमचे नेतृत्व करण्यासाठी आम्हाला एक राजा नेमून द्या,” त्यामुळे शमुवेल दुःखी झाला; आणि त्याने याहवेहकडे प्रार्थना केली.
देव ही मागणी नकार म्हणून पाहतो
७
तेव्हा याहवेहने शमुवेलला सांगितले: “लोक तुला जे सांगत आहेत ते सगळे ऐक; त्यांनी तुझा नकार नाही तर त्यांचा राजा म्हणून त्यांनी माझा नकार केला आहे.
८
मी त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांनी असेच केले आहे, त्यांनी माझा त्याग करून इतर दैवतांची सेवा केली, तसेच ते तुझ्याशीही करीत आहेत.
९
आता त्यांचे ऐकून घे; परंतु त्यांना गंभीरपणे चेतावणी दे, जो राजा त्यांच्यावर राज्य करेल तो त्यांच्याकडून त्याला हवे ते हक्काने मागेल हे त्यांना माहीत होऊ दे.”
इशारा: राजाची पद्धत
१०
शमुवेलाने याहवेहचे सर्व शब्द त्या लोकांना सांगितले जे त्यांच्याकडे राजा मागत होते.
११
शमुवेल म्हणाला, “जो राजा तुमच्यावर राज्य करेल तो या गोष्टी तुमच्याकडून हक्काने मागेल: तो तुमचे पुत्र घेईल आणि त्यांना त्याचे रथ आणि घोडे यांच्याबरोबर सेवा करावयास लावील आणि ते त्याच्या रथांच्या पुढे धावतील.
१२
त्यातील काहींना हजारांवर तर काहींना पन्नासांवर तो सरदार म्हणून नेमील, आणि इतरांना जमीन नांगरण्याचे आणि पिकांची कापणी करण्यास व काहींना युद्धाची शस्त्रे आणि त्याच्या रथांसाठी हत्यारे तयार करण्यास लावील.
१३
तो तुमच्या कन्यांना अत्तरे तयार करणार्या, स्वयंपाकिणी व भटारणी असे करेल.
१४
तो तुमची उत्तम शेती, द्राक्षमळे व जैतुनाचे मळे घेईल आणि त्याच्या सेवकांस देईल.
१५
तो तुमच्या धान्यातील व द्राक्षमळे यांचा दहावा हिस्सा घेऊन त्याच्या अधिकाऱ्यांना आणि सेवकांना देईल.
१६
तुमचे दास व दासी आणि तुमचे उत्तम पशू व गाढवे तो स्वतःच्या उपयोगासाठी घेईल.
१७
तो तुमच्या कळपांचा दहावा हिस्सा घेईल आणि तुम्ही त्याचे गुलाम व्हाल.
१८
जेव्हा तो दिवस येईल, तेव्हा तुम्ही निवडून घेतलेल्या राजापासून सुटका मिळावी म्हणून तुम्ही रडाल, परंतु याहवेह त्या दिवशी तुमचे ऐकणार नाही.”
लोक आग्रह धरतात आणि देव संमती देतो
१९
परंतु लोकांनी शमुवेलाचे ऐकण्यास नकार दिला. “नाही!” ते म्हणाले, “आम्हाला आमच्यावर राजा पाहिजेच.
२०
म्हणजे आम्ही इतर सर्व राष्ट्रांसारखे होऊ, आमचा राजा आमचे नेतृत्व करेल आणि आमच्यासाठी युद्ध करण्यास आमच्यापुढे जाईल.”
२१
लोक जे म्हणाले ते सर्व शमुवेलाने ऐकले व तेच त्याने याहवेहला सांगितले.
२२
याहवेहने उत्तर दिले, “त्यांचे ऐकून घे आणि त्यांना एक राजा नेमून दे.” नंतर शमुवेल इस्राएल लोकांना म्हणाले, “तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या नगराकडे परत जा.”
Use ← → arrow keys to navigate
Settings
Reading Style
Typeface
Font Size px
Reading Width chars
Options
Study Note