गीतरत्न २:१-७
१
मी शारोनाचा गुलाब आहे, खोर्यातील कमळ आहे.
२
खरेच, काट्यांमध्ये कमळ तशी इतर तरुणींमध्ये माझी प्रिया आहे.
३
जसे जंगलातील इतर झाडांमध्ये सफरचंदाचे झाड, तसा इतर तरुणांमध्ये माझा प्रियकर आहे. त्याच्या छायेत बसणे मला आनंददायी आहे, आणि त्याचे फळ मला चवीला गोड लागते.
४
त्याने मला आपल्या मेजवानगृहात आणावे, त्याच्या प्रेमाचा ध्वज माझ्यावर असावा.
५
मनुक्यांनी मला बळ द्या, सफरचंदांनी मला ताजेतवाने करा, कारण प्रेमात मी दुर्बल झाले आहे.
६
त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली आहे, आणि त्याच्या उजव्या हाताने तो मला आलिंगन देतो.
७
यरुशलेमच्या कन्यांनो, तुम्हाला रानातील मृगांची आणि हरिणीची शपथ, त्याची इच्छा आहे तोपर्यंत माझ्या प्रेमाला जागे करू नका.
Settings