मुख्य मजकुरावर जा
रूथ २:१८-२३

नओमीला जवळचा नातेवाईक कळतो

रूथ २:१८-२३
१८
ते घेऊन ती नगरात गेली आणि तिच्या सासूने पाहिले की तिने किती गोळा केले आहे. रूथने खाऊन राहिलेले अन्नसुद्धा आणले आणि ते तिला दिले.
१९
तिच्या सासूने तिला विचारले, “धान्य गोळा करण्यासाठी आज तू कुठे गेली होतीस? तू कुठे काम केलेस? ज्याने तुझी एवढी काळजी घेतली, तो मनुष्य आशीर्वादित असो!” तेव्हा रूथने तिच्या सासूला त्याच्याबद्दल सांगितले ज्याच्या ठिकाणी ती काम करीत होती. ती म्हणाली, “ज्या माणसाबरोबर मी आज काम केले त्याचे नाव बवाज आहे,”
२०
नाओमी तिच्या सुनेला म्हणाली, “याहवेह त्याला आशीर्वादित करो! त्यांनी जिवंतांना आणि मृतांना त्यांचा चांगुलपणा दाखविणे थांबविले नाही.” ती पुढे म्हणाली, “तो मनुष्य आपला जवळचा नातेवाईक आहे; तो आम्हाला सोडविणाऱ्यांपैकी एक आहे.”
२१
तेव्हा मोआबी रूथ म्हणाली, “तो मला असेही म्हणाला की, ‘जोपर्यंत ते माझ्या संपूर्ण धान्याची कापणी करीत आहेत, तोपर्यंत माझ्या कामकऱ्यांबरोबर राहा.’ ”
२२
नाओमी तिची सून रूथला म्हणाली, “माझ्या मुली, त्याच्यासाठी काम करणाऱ्या स्त्रियांबरोबर जाणे हे तुझ्यासाठी हिताचे होईल, कारण दुसर्‍या कोणाच्याही शेतात तुझ्यावर अत्याचार होण्याची शक्यता आहे.”
२३
म्हणून जव आणि गव्हाची कापणी संपेपर्यंत रूथ जव गोळा करीत बवाजच्या स्त्रियांच्या जवळच राहिली. ती तिच्या सासूसह राहिली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options