मुख्य मजकुरावर जा
प्रकटीकरण ७:१-८

देवाच्या सेवकांवर शिक्का

प्रकटीकरण ७:१-८
त्यानंतर पृथ्वीच्या चारही कोपर्‍यांवर चार देवदूत उभे राहिलेले मी पाहिले. पृथ्वीवरील भूमी, समुद्र किंवा कोणताही वृक्ष, यावर वाहू नये म्हणून ते त्या चारही वार्‍यांना थोपवून धरीत होते.
मग दुसरा देवदूत पूर्वेच्या दिशेने हातात जिवंत परमेश्वराचा शिक्का घेऊन येताना मी पाहिला. पृथ्वीला व समुद्राला इजा करण्याचे काम ज्या चार देवदूतांवर सोपविले होते, त्या चार देवदूतांना तो ओरडून म्हणाला,
“आम्ही परमेश्वराच्या सेवकांच्या कपाळावर परमेश्वराचा शिक्का मारीपर्यंत पृथ्वी, समुद्र किंवा वृक्ष यांना काहीही इजा करू नका.”
ज्या लोकांवर हा शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली: ते इस्राएलच्या सर्व बारा वंशांमधून 1,44,000 लोक होते.
यहूदाह वंशातून 12,000; रऊबेन वंशातून 12,000; गाद वंशातून 12,000;
आशेर वंशातून 12,000; नफताली वंशातून 12,000; मनश्शेह वंशातून 12,000;
शिमोन वंशातून 12,000; लेवी वंशातून 12,000; इस्साखार वंशातून 12,000;
जबुलून वंशातून 12,000; योसेफ वंशातून 12,000; बन्यामीन वंशातून 12,000.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options