Skip to content
प्रकटीकरण ६:१२-१७

प्रकटीकरण ६:१२-१७

१२
मी पाहत असताना त्याने सहावा शिक्का फोडला, तेव्हा एक प्रचंड भूमिकंप झाला. सूर्य शेळ्याच्या केसांपासून तयार केलेल्या गोणपाटासारखा काळा झाला; चंद्र रक्तासारखा लाल झाला.
१३
अंजिराच्या वृक्षांवरील कच्ची फळे एखाद्या प्रचंड वादळाने गळून पडतात, तसे आभाळातील तारे भूमीवर गळून पडतांना मला दिसले.
१४
एखाद्या गुंडाळीप्रमाणे अंतराळ गुंडाळले गेले आणि प्रत्येक पर्वत व बेट हादरून आपल्या जागेवरून ढळले.
१५
तेव्हा पृथ्वीवरील राजे, राजपुत्र, सैन्याचे उच्चाधिकारी, श्रीमंत तसेच बलवान लोक, सर्व लहान थोर माणसे, गुलाम आणि स्वतंत्र लोक, सर्वजण डोंगराच्या गुहांमध्ये व खडकांमध्ये दडून बसले.
१६
ते डोंगरटेकड्यांना उद्देशून ओरडून विनवू लागले, “आम्हावर पडून जे राजासनावर बसले आहेत, त्यांच्या नजरेपासून आणि कोकर्‍याच्या क्रोधापासून आम्हाला लपवा!
१७
कारण त्यांच्या क्रोधाचा महान दिवस आला आहे, त्यात कोणाचा निभाव लागेल?”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options