मुख्य मजकुरावर जा
प्रकटीकरण २:१२-१७

पर्गम येथील मंडळीला संदेश

प्रकटीकरण २:१२-१७
१२
“पर्गमम येथील मंडळीच्या देवदूताला लिही: ज्यांच्याजवळ तीक्ष्ण आणि दुधारी तलवार आहे, ते असे म्हणतात:
१३
तुम्ही कुठे राहता हे मला ठाऊक आहे, जिथे सैतानाचे आसन आहे तिथे. तुम्ही माझे नाव दृढ धरून राहिला आहात. माझा विश्वासू साक्षीदार अंतिपा जो तुमच्या शहरामध्ये जिथे सैतान राहतो, तिथे ठार मारला गेला, त्या दिवसातही तुम्ही माझ्यावरील विश्वास नाकारला नाही.
१४
परंतु, माझ्याजवळ तुमच्याविरुद्ध काही गोष्टी आहेत: त्या या की, बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे काही लोक तुमच्यामध्ये आहेत. त्यांनी बालाकाच्या शिक्षणानुसार इस्राएली लोकांपुढे असे अडखळण केले की, जेणे करून त्यांनी मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खावा व लैंगिक अनीती करावी.
१५
याचप्रमाणे, निकलाइतांच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तुमच्यातही आहेत.
१६
यास्तव पश्चात्ताप कर! नाही तर, मी तुमच्याकडे लवकरच येऊन माझ्या तोंडातून निघणार्‍या तलवारीने त्यांच्याविरुद्ध लढेन.
१७
ज्याला ऐकावयास कान आहेत तो, आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ते ऐको, जो विजय मिळवितो त्याला गुप्त राखलेल्या मान्न्यातून मी देईन आणि ज्यावर नवे नाव लिहिलेले असेल तो पांढरा खडाही मी त्या व्यक्तीला देईन, जे तो खडा घेणार्‍याशिवाय कोणालाही माहीत नसेल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options