स्तोत्रसंहिता ७२:७-१४
७
त्याच्या कारकिर्दीत सर्व नीतिमानांची भरभराट होवो आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत समृद्धी वाढो.
८
त्याची सत्ता एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत आणि नदीपासून पृथ्वीच्या दिगंतापर्यंत राहो.
९
अरण्यातील लोक त्याच्यासमोर नतमस्तक होवोत आणि त्याचे शत्रू धूळ चाटोत.
१०
तार्शीश आणि तटवर्तीय राजे आपआपले नजराणे आणोत, शबा व सबा यांचे सर्व राजे आपले उपहार आणोत.
११
होय, सर्व ठिकाणचे राजे त्याला नमन करोत; सर्व राष्ट्रे त्याची सेवा करोत.
१२
ज्यांचा कोणी सहायक नाही अशा धावा करणार्या दुःखितांना तो मुक्त करेल.
१३
दुर्बल आणि दरिद्री यांची त्याला दया येवो; तो गरजवंताला मृत्यूपासून वाचवेल.
१४
तो त्यांना छळ आणि हिंसा यांच्यापासून वाचवेल, कारण त्यांचे जीवित रक्त मोलाचे आहे.
Settings