मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ७१:९-१३

वृद्धापकाळातील संकट व शत्रूंची थट्टा

स्तोत्रसंहिता ७१:९-१३
माझ्या वृद्धावस्थेत माझा त्याग करू नका; माझी शक्ती म्लान होत असता मला सोडू नका.
१०
माझे शत्रू माझ्याविरुद्ध बोलतात; माझा जीव घेणारे एकत्र येऊन मसलत करतात.
११
ते म्हणतात, “परमेश्वराने त्याचा त्याग केला आहे; त्याचा पाठलाग करून त्याला धरा, कारण त्याला कोणीही सोडविणारा नाही.”
१२
परमेश्वरा, माझ्यापासून दूर राहू नका, माझ्या परमेश्वरा, लवकर येऊन माझे साहाय्य करा.
१३
जे माझ्यावर आरोप लावतात ते लज्जित होऊन नष्ट होवोत; जे माझे वाईट करू इच्छितात त्यांना अपयश आणि अप्रतिष्ठा यांनी आच्छादून टाका.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options