स्तोत्रसंहिता ७१:५-८
५
प्रभू याहवेह, केवळ तुम्हीच माझे आशास्थान आहात; तारुण्यापासून मी तुमच्यावर भरवसा ठेवला आहे.
६
जन्मापासूनच मी तुमच्यावर अवलंबून आहे; तुम्ही मला माझ्या आईच्या गर्भातून बाहेर आणले. मी सर्वकाळ तुमची स्तुती करेन.
७
अनेक लोकांसाठी मी एक उदाहरण झालो आहे; तुम्ही माझे प्रबळ शरणस्थान आहात.
८
माझे मुख तुमच्या स्तुतीने भरलेले असते, दिवसभर तुमच्या वैभवाची घोषणा करतो.
Settings