Skip to content
स्तोत्रसंहिता ६९:१३-२१

स्तोत्रसंहिता ६९:१३-२१

१३
तरी याहवेह, तुमच्या प्रसन्नतेच्या वेळेसाठी मी तुमच्याकडे प्रार्थना करीत आहे; हे परमेश्वरा तुमच्या महान प्रीती निमित्त तुमच्या विश्वसनीय तारणाद्वारे मला उत्तर द्या.
१४
मला या दलदलीतून बाहेर काढा; मला त्यामध्ये बुडू देऊ नका; माझा द्वेष करणार्‍यापासून मला वाचवा. खोल पाण्यातून मला बाहेर काढा.
१५
महापुरांच्या लोंढ्यात मला बुडू देऊ नका किंवा डोहाला मला गिळू देऊ नका; गर्तेच्या जाभाडात मला गुंतून पडू देऊ नका.
१६
याहवेह, तुमच्या प्रीतिपूर्ण दयेने माझ्या प्रार्थनेची उत्तरे द्या; तुम्ही विपुल कृपेने आपले मुख माझ्याकडे करा.
१७
तुम्ही आपल्या सेवकापासून आपले मुख लपवू नका; त्वरेने मला उत्तर द्या, कारण मी संकटात सापडलो आहे.
१८
माझ्याजवळ या आणि माझा बचाव करा; माझ्या शत्रूपासून मला सोडवा.
१९
ते माझी कशी निंदा करतात, विटंबना आणि अप्रतिष्ठा करतात हे तुम्ही जाणता; माझे सर्व शत्रू तुमच्यापुढे आहेत.
२०
त्यांच्याकडून होणार्‍या तिरस्काराने माझे हृदय भग्न झाले आहे; मी अत्यंत हतबल झालो आहे; मी सहानुभूतीची अपेक्षा केली, पण ती मला मिळाली नाही; मी सांत्वना देणार्‍यांचा शोध घेतला पण मला कोणीही आढळले नाही.
२१
अन्न म्हणून त्यांनी मला विष दिले, तहान भागविण्यासाठी त्यांनी मला आंब दिला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options