Skip to content
स्तोत्रसंहिता ६९:२२-२९

स्तोत्रसंहिता ६९:२२-२९

२२
त्यांच्यासाठी तयार केलेला मेज सापळा असा होवो; ते स्वस्थ असता त्यांच्यासाठी ते सूड व पाश ठरतील.
२३
त्यांचे डोळे अंधकारमय होवोत म्हणजे त्यांना दिसणार नाही, आणि त्यांची कंबर कायमची खाली वाकवून ठेवा.
२४
तुमचा सर्व क्रोध त्यांच्यावर ओता; तुमचा संतापाचा भयानक अग्नी त्यांच्यावर येऊ द्या.
२५
त्यांचे ठिकाण ओसाड पडो; त्यांच्या तंबूत कोणीही वस्ती न करो.
२६
कारण ज्याला तुम्ही शासन केले, त्याचाच ते छळ करतात, आणि ज्याला तुम्ही घायाळ केले, त्यांच्या वेदनेबद्दल ते बोलतात.
२७
त्यांच्या दुष्कृत्यांच्या प्रमाणात तुम्ही त्यांना शासन करा आणि तुमच्या तारणाचा वाटा त्यांना देऊ नका.
२८
जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे खोडली जावोत; नीतिमानांच्या यादीत त्यांची नावे येऊ नयेत.
२९
मी दुःखित आणि पीडित आहे— परमेश्वर तुमचे तारणच माझी सुरक्षा आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options