मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ५५:१६-२३

समर्थनासाठी देवावर विश्वास

स्तोत्रसंहिता ५५:१६-२३
१६
मी तर परमेश्वराचा धावा करेन आणि याहवेह माझे तारण करतील.
१७
संध्याकाळी, सकाळी आणि दुपारी मी वेदनांनी आरोळी देईन आणि ते माझी वाणी ऐकतील.
१८
जरी माझे बरेच विरोधक तिथे होते, जे युद्ध माझ्याविरुद्ध सुरू होते, तरी ते मला कोणतीही इजा होऊ न देता सोडवितात.
१९
परमेश्वर प्राचीन काळापासून राजासनारूढ आहेत, जे बदलत नाहीत— ते त्यांचे ऐकतील व त्यांना नम्र करतील, कारण त्यांना परमेश्वराचे भय नाही. सेला
२०
माझा जोडीदार आपल्याच मित्रांवर प्रहार करीत आहे; त्याने केलेला करार तोच मोडत आहे.
२१
त्याचे शब्द लोण्याप्रमाणे मृदू वाटतात, पण त्याच्या अंतःकरणात युद्ध सुरू आहे; त्याचे शब्द तेलापेक्षाही मऊ होते, पण उगारलेल्या तलवारींसारखे होते.
२२
तू आपला भार याहवेहवर टाक आणि ते तुला आधार देतील; नीतिमानाला ते कधीही विचलित होऊ देणार नाही.
२३
परंतु, हे परमेश्वरा, तुम्ही शत्रूंना नाशाच्या गर्तेत लोटून द्याल; खुनी आणि लबाड लोक त्यांचे अर्धे आयुष्यही जगणार नाहीत. परंतु मी तर तुमच्यावरच भरवसा ठेवतो.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options