Skip to content
स्तोत्रसंहिता ५५:९-१५

स्तोत्रसंहिता ५५:९-१५

प्रभू, दुष्टांमध्ये फूट पाडा, त्यांच्या शब्दांना गोंधळात टाका, कारण शहरात मला हिंसा आणि कलह दिसतात.
१०
रात्रंदिवस ते तटाभोवती फिरत असतात; दुष्टपणा व अनीतिमानपणा नगरात आहे.
११
नगरात विध्वंसक शक्ती कार्यरत आहेत; धमक्या आणि खोट्या गोष्टी कधीही त्यांचा मार्ग सोडत नाही.
१२
ज्याने माझी निंदा केली, तो काही माझा शत्रू नव्हता; असता तर मी ते सहन केले असते; मी लपून बसलो असतो आणि निसटून गेलो असतो.
१३
परंतु माझी निंदा करणारा तूच होतास, माझ्यासारखाच मनुष्य, माझा सोबती आणि माझा जिवलग मित्र,
१४
जेव्हा आम्ही आराधकांसह चालत होतो, तेव्हा त्याच्यासोबत परमेश्वराच्या भवनातील मधुर सहभागितेचा मी आनंद घेतला होता.
१५
मृत्यू माझ्या शत्रूंना अकस्मात गाठो; ते जिवंतच अधोलोकात उतरले जावोत, कारण त्यांच्या घरात, त्यांच्या आत्म्यात दुष्टपणा आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options