स्तोत्रसंहिता ५६:१-४
१
संगीत दिग्दर्शकासाठी. “दूरच्या एला वृक्षावर बसलेला कबुतर” या चालीवर आधारित. दावीदाची मिक्ताम गाण्याची रचना. पलिष्ट्यांनी गथ देशात दावीदाला धरले, त्या घटनेचा हा संदर्भ आहे. हे परमेश्वरा, मजवर दया करा, कारण शत्रू त्वेषाने माझा पाठलाग करीत आहे; दिवसभर निकराने ते माझ्यावर हल्ले करीतच असतात.
२
माझे शत्रू दिवसभर माझा पाठलाग करीत आहेत; माझ्यावर गर्वाने प्रहार करणारे अनेकजण आहेत.
३
परंतु ज्यावेळी मला भय वाटेल, त्यावेळी मी तुमच्यावर भरवसा टाकेन.
४
परमेश्वरामध्ये मी त्यांच्या वचनाची प्रशंसा करेन. मी परमेश्वरावर विसंबून आहे आणि मी भिणार नाही. मर्त्य मानव माझे काय करणार?
Settings