मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ११९:१६९-१७६

ताव: समज व साहाय्यासाठी अंतिम प्रार्थना

स्तोत्रसंहिता ११९:१६९-१७६
१६९
हे याहवेह, माझी हाक तुम्हापर्यंत पोहचो; आपल्या वचनाप्रमाणे मला विवेकवंत करा.
१७०
माझी प्रार्थना तुम्हापर्यंत पोहचो; तुम्ही आपल्या अभिवचनाप्रमाणे माझी सुटका करा.
१७१
माझे ओठ भरभरून तुमचे स्तवन करो, कारण तुम्ही मला तुमचे विधी शिकविले आहेत.
१७२
माझी जीभ तुमच्या वचनांची स्तुतिगीते गाओ, कारण तुमचे सर्व नियम नीतियुक्त आहेत.
१७३
मला साहाय्य करण्यास तुमची भुजा सतत तयार राहो, कारण मी तुमच्या अधिनियमांचा स्वीकार केला आहे.
१७४
हे याहवेह, मी तुमच्या तारणाची उत्कंठा धरलेली आहे; तुमचे नियम माझा अत्यानंद देतात.
१७५
मला आयुष्यमान करा, जेणेकरून मी तुझी स्तुती करेन, आणि तुमचे नियम माझी जोपासना करोत.
१७६
हरवलेल्या मेंढराप्रमाणे मी बहकलो, माझा शोध घ्या, कारण तुमच्या आज्ञा मी विसरलो नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options