Skip to content
स्तोत्रसंहिता ११९:१६१-१६८

स्तोत्रसंहिता ११९:१६१-१६८

१६१
अधिपतींनी कारण नसताना माझा छळ केला, परंतु माझे हृदय केवळ तुमच्याच वचनांनी कंपित होते.
१६२
मोठा धनसंचय सापडलेल्या मनुष्याला होतो, तसा मला तुमच्या अभिवचनांनी आनंद होतो.
१६३
असत्याचा मी द्वेष व घृणा करतो, पण तुमच्या नियमांवर मी प्रीती करतो.
१६४
तुमच्या नीतियुक्त नियमांबद्दल दिवसातून सात वेळा मी तुमचे स्तवन करतो.
१६५
जे तुमच्या नियमांवर प्रीती करतात, त्यांना मोठी शांती लाभते, आणि ते कधीही विचलित होत नाहीत.
१६६
याहवेह, तुमच्या तारणाची मी प्रतीक्षा करतो, आणि मी तुमच्या आज्ञा पाळतो.
१६७
मी तुमच्या आज्ञांचे पालन करतो, कारण त्या मला अतिशय प्रिय आहेत.
१६८
मी तुमचे उपदेश व नियम पाळतो, कारण माझा प्रत्येक मार्ग तुम्हाला माहीत आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options